'जेन झी'ना टार्गेट करा! केंद्रीय अर्थमंत्र्यांचे बँकांना आवाहन (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

'जेन झी'ना टार्गेट करा! केंद्रीय अर्थमंत्र्यांचे बँकांना आवाहन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २ ऑक्टोबर २०२६ पासून 'बँकिंग फॉर यूथ' ही महिनाभराची विशेष मोहीम सुरू करण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना २ ऑक्टोबर २०२६ पासून 'बँकिंग फॉर यूथ' ही महिनाभराची विशेष मोहीम सुरू करण्याचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. 'पीएसबी कॉन्फ्लुअन्स २०२६' या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना त्यांनी सरकारी बँकांनी भारतातील तरुणांशी अधिक मजबूत आणि दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याचे आवाहन केले.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ही मोहीम वित्तीय सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्या समन्वयाने राबवली जाऊ शकते. १६ वर्षांवरील तरुण नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या आर्थिक प्रवासाच्या सुरुवातीलाच औपचारिक बँकिंग व्यवस्थेशी जोडणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तरुणांनी बँकेच्या शाखांमध्ये येण्याची वाट न पाहता बँकांनी थेट महाविद्यालये, विद्यापीठे आणि कौशल्य विकास केंद्रांपर्यंत पोहोचावे, असे त्यांनी सुचवले.

जीवनशैलीशी निगडित फायदे : बँकांनी तरुणांना फिटनेस सेंटर्स, योग सेंटर्स, मानसिक आरोग्य प्लॅटफॉर्मचे कूपन्स, व्हाऊचर्ससारखे लाइफस्टाईल फायदे द्यावेत.

युवा किऑस्क : बँकांच्या भौतिक शाखांमध्ये 'युवा किऑस्क' किंवा 'युवा बँकिंग मित्र' यांसारखी स्वतंत्र जागा तयार करावी.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई महापालिकेच्या कारभारात ५० ‘फेलो’; स्थायी समिती अध्यक्ष, आयुक्तांसह खाते प्रमुखांच्या दिमतीसाठी नियुक्ती

दिव्यांगांसाठी पेन्शन योजना पुन्हा कार्यान्वित; मुंबईतील ५६ हजारांहून अधिक दिव्यांगांना दिलासा

Mumbai : विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात ३० मिनिटे अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य

Mumbai : वांद्रे येथील मैदानाच्या आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर; नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन व सेंटर उभारण्याचा मार्ग मोकळा

Mumbai : दुकान नोंदणीसाठी सोसायटीच्या एनओसीचा आग्रह धरू नका; हायकोर्टाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश