औषधे स्वस्त हवी! नीती आयोगाची अपेक्षा; चीनवरील अवलंबित्वाबद्दल इशारा 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

औषधे स्वस्त हवी! नीती आयोगाची अपेक्षा; चीनवरील अवलंबित्वाबद्दल इशारा

भारत ही जगाची औषधशाळा आहे. आपण औषध क्षेत्रात प्रमाणाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत असलो तरी आपल्याला मूल्य साखळीत वरच्या स्तरावर जाण्याची गरज आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत ही जगाची औषधशाळा आहे. आपण औषध क्षेत्रात प्रमाणाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करत असलो तरी आपल्याला मूल्य साखळीत वरच्या स्तरावर जाण्याची गरज आहे. भारतीय औषध कंपन्यांनी चांगल्या दर्जाची आणि वाजवी किमतीची ब्रँडेड उत्पादने आणल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान अधिक बळकट करता येईल, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी यांनी म्हटले आहे.

भारताची औषध निर्मिती पुरवठा साखळी अजूनही अत्यावश्यक औषध घटक आणि मुख्य कच्च्या मालासाठी चीनवरील आयातीवर मोठ्या प्रमाणावर म्हणजेच ६५ टक्के अवलंबून आहे, असे नीती आयोगाने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या 'ट्रेड वॉच क्वार्टरली'च्या आठव्या आवृत्तीत म्हटले आहे. वाढत्या पर्यावरणीय नियमांमुळे भारतातील उत्पादन आणि संशोधन व विकास खर्चात मोठी वाढ झाली आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

भारताची औषध पुरवठा साखळी, विशेषतः किण्वन-आधारित उत्पादनांसाठी लागणारे अत्यावश्यक औषध घटक, मुख्य कच्चा माल आणि मध्यवर्ती उत्पादनांसाठी ६५ टक्के चीनवर अवलंबून आहे.

कमकुवत नवोपक्रम आणि व्यापारीकरण परिसंस्थेमुळे संशोधक आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

भारत आणि जागतिक बाजारपेठ

  • भारत स्वस्त जेनेरिक औषधांचा मोठा पुरवठादार आहे. भारत आफ्रिकेच्या ५० टक्के, अमेरिकेच्या ४० टक्के, ब्रिटनच्या

  • २५ टक्के जेनेरिक औषधांची गरज पूर्ण करतो.

  • २०२५ मध्ये जागतिक औषध बाजारपेठेची मागणी

  • १३ लाख कोटी डॉलर होती.

  • आर्थिक वर्ष २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भारताचा एकूण व्यापार ५.४ टक्क्यांनी वाढून १८.४ लाख कोटी डॉलरवर

  • पोहोचला आहे.

  • २०२६ च्या चौथ्या तिमाहीत भारताची वस्तू निर्यात २.८ टक्क्यांनी घटली असली तरी आयात १२ टक्क्यांनी वाढली आहे.

  • सेवा निर्यात ९ टक्क्यांनी वाढून ११.१ लाख कोटी डॉलर झाली आहे, तर आयात ४.१ टक्क्यांनी वाढली आहे.

  • २०२५ मध्ये भारत जगातील आठव्या क्रमांकाचा सेवा निर्यातदार देश राहिला आहे.

व्यापाराची स्थिती

  • २०२५-२६ मध्ये चीन अमेरिकेला मागे टाकून भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार १५१.१ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.

  • गेल्या आर्थिक वर्षात भारताची चीनला होणारी निर्यात

  • ३६.६६ टक्क्यांनी वाढून १९.४७ अब्ज डॉलर झाली, तर आयात १६ टक्क्यांनी वाढून १३१.६३ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

  • भारताची व्यापारी तूट २०२५-२६ मध्ये ११२.६ अब्ज डॉलरपर्यंत विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा