राष्ट्रीय

नितीशकुमार जोड नितीशकुमारांचे वक्तव्य अश्लील- ओवैसी

बिहारची विधानसभा आहे चित्रपटगृह नव्हे हे नितीशकुमार यांनी समजून घ्यायला हवे, असेही ओवैसी म्हणाले.

नवशक्ती Web Desk

हैदराबाद : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसंख्या नियंत्रणासंबंधी महिलांच्या शिक्षणासंबंधात केलेले वक्तव्य आणि भाषा ही अश्लील असल्याचे सांगत त्यांनी ते विधान मागे घ्यावे असे मत एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी अश्लील भाषेत हे वक्तव्य केले असल्याचे सांगत जर महिला शिक्षित असतील, तर अपत्य कधी व्हावे याचा त्या निर्णय घेऊ शकतील असे त्यांनी म्हणायला हवे मात्र त्याऐवजी त्यांन अश्लील भाषा वापरली, ते योग्य नाही. ही बिहारची विधानसभा आहे चित्रपटगृह नव्हे हे नितीशकुमार यांनी समजून घ्यायला हवे, असेही ओवैसी म्हणाले.

महिला आयोगाच्या प्रमुख व प्रियंका चतुर्वेदी यांच्यात जुंपली

नितीशकुमार यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. शर्मा यांनी नितीशकुमार यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली महिलांबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल असंवेदनशील आणि प्रतिगामी विधान त्यांनी केले आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे असे सांगितले. मात्र, या संबंधात शर्मा यांच्या पक्षपाती संधीसाधू मौनाबद्दल प्रियंका चतुर्वैदी यांनी टीका केली आहे. शर्मा या सोयीस्कर असेल तेव्हा बोलतात मौन बाळगतात व कृती करतात, असे सांगत शर्मा यांच्यावर चतुर्वेदी यांनी या निमित्ताने राजकीय निशाणा साधला.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश