नितीश कुमार संग्रहित फोटो
राष्ट्रीय

नितीश कुमार यांनी प्रथमच गृहमंत्रीपद सोडले

नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात पहिल्यांदाच गृहखाते सोडले असून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृहखात्याची जबाबदारी स्वीकारतील.

Swapnil S

पाटणा : नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात पहिल्यांदाच गृहखाते सोडले असून ते खाते आता भाजपकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी गृहखात्याची जबाबदारी स्वीकारतील. हे मंत्रालय नितीश कुमार यांनी २० वर्षे सांभाळले होते. मंगल पांडे यांना आरोग्य खाते सोपवण्यात आले असून पहिल्यांदाच मंत्री झालेल्या राष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंग यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. ‘एचएएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष सुमन यांचे खाते कायम आहे. ते पुन्हा लघु जलसंपदा मंत्री असतील.

उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना जमीन आणि महसूल खाते तसेच खाण आणि भूगर्भशास्त्र खाते देण्यात आले आहे. तथापि, कृषी खाते त्यांच्याकडून काढून भाजप कोट्यातील मंत्री रामकृपाल यादव यांना देण्यात आले आहे. दिलीप जैस्वाल यांना उद्योग मंत्री करण्यात आले आहे. नितीन नवीन यांना नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रामकृपाल यादव यांना कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. संजय टायगर यांना कामगार संसाधन मंत्री, अरुण शंकर प्रसाद यांना पर्यटन विभाग तसेच कला, संस्कृती आणि युवा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सुरेंद्र मेहता यांना प्राणी आणि मत्स्य व्यवसाय संसाधन खाते, नारायण प्रसाद यांना आपत्ती व्यवस्थापन खाते देण्यात आले आहे, तर रमा निषाद यांना मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय कल्याण खाते देण्यात आले आहे.

Delhi Car Blast : २०२३ पासून जैशचा भारतात साखळी स्फोट घडवण्याचा कट; मुजम्मिल शकीलची चौकशीत धक्कादायक कबुली

उमेदवारांना खुर्च्या न दिल्याने अजित पवार भडकले; पोलिसांनाही सुनावलं, म्हणाले, "सांगितलेलं कळतं नाही...

ट्रम्प फॅसिस्ट आहेत का? पत्रकारांचा थेट सवाल; ममदानींना थांबवत डोनाल्ड ट्रम्पच बोलले, “स्पष्टीकरण...

पालघर : शाळेची बॅग ठरली ढाल! पाचवीतल्या २ मित्रांची बिबट्याशी थरारक झुंज

देशात चार नवीन कामगार संहिता लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ४० कोटी कामगारांना ‘सुरक्षा कवच’