मल्लिकार्जुन खर्गे यांचे संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

विरोधकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सभापतींकडून सातत्याने गदा - खर्गे

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केला आणि सभापतींच्या नि:पक्षपातीपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Swapnil S

नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हे पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी केला आणि सभापतींच्या नि:पक्षपातीपणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकशाही पायदळी तुडविणे ही राज्यसभेत आता प्रथाच बनली आहे, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.

सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर चर्चा करण्यास अनुमती न देण्यासह अन्य मुद्द्यांवरही आडमुठी भूमिका घेऊन धनखड सातत्याने विरोधकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. धनखड हे पक्षपाती असल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव सादर केल्यानतंर दोन दिवसांनी खर्गे यांनी धनखड यांच्यावर टीकास्र सोडले आहे.

धनखड पक्षपात करीत असले तरी आम्ही त्यापुढे झुकणार नाही, आम्ही प्रत्येक नागरिकाच्या लोकशाही हक्कासाठी आणि घटनेच्या रक्षणासाठी लढा देत राहू, असेही ते म्हणाले.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरात कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा