राष्ट्रीय

‘गेम्सक्राफ्ट’ला जीएसटी महासंचालनालयाने पाठवली नोटीस

आतापर्यंत जीएसटी संकलनासाठी देशात पाठवण्यात आलेली ही सर्वाधिक रकमेची नोटीस आहे

वृत्तसंस्था

बंगळुरुमधील एका गेमिंग कंपनीला तब्बल २१ हजार कोटी रुपयांची वस्तू व सेवा कर (जीएसटी) नोटीस पाठवण्यात आली आहे. गेम्सक्राफ्ट टेक्नोलॉजी असे या कंपनीचे नाव आहे. २०१७ ते ३० जून २०२२ दरम्यान या कंपनीने जीएसटीच्या माध्यमातून करचोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘गेम्सक्राफ्ट’ला आता जीएसटी महासंचालनालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत जीएसटी संकलनासाठी देशात पाठवण्यात आलेली ही सर्वाधिक रकमेची नोटीस आहे.

ऑनलाइन गेम्सच्या काही चाहत्यांनी एकत्र येत २०१७ मध्ये ही कंपनी सुरु केली. मोबाईलवर खेळता येणारे रमी, गेमझी, रमी टाइम यासारख्या आर्थिक व्यवहारांवर आधारित आणि बेटीसंदर्भातील गेम्सची सेवा या कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात आली. आता जीएसटी महासंचालनालयाने या कंपनीने ऑनलाइन बेटिंगला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवला आहे. आपल्या ऑनलाइन जाहिराती आणि ऑफर्सच्या माध्यमातून या कंपनीने बेटींगला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. महासंचालनालयाने या कंपनीच्या माध्यमातून एकूण ७७ हजार कोटींची बेटिंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. २०१७ ते ३० जून २०२२ पर्यंतच्या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या या बेटींगवर २८ टक्क्यांच्या हिशोबाने २१ हजार कोटींचा जीएसटी लागू होतो.

ऑनलाइन माध्यमातून खेळवल्या जाणाऱ्या गेम्सवर खरोखर पैसे लावण्यासाठी ही कंपनी प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देते असं जीएसटी महासंचालनालयाचं म्हणणं आहे. या कंपनीच्या चौकशीदरम्यान फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे ग्राहकांना कंपनीकडून बिलं देण्यात आलेली आहे. तसेच खोटी कागदपत्रं सादर करण्यात आल्याचंही स्पष्ट झालं आहे. एकदा या ‘गेम्सक्राफ्ट वॉलेट’मध्ये पैसे टाकले की युझर्सला ते परत मिळण्याचा कोणताच मार्ग नसतो असंही महासंचालनालयाने म्हटलं आहे. या प्रकरणासंदर्भात ‘गेम्सक्राफ्ट’च्या प्रवक्त्यांनी, “कौशल्य दाखवणाऱ्या खेळांना कायदेशीर संरक्षण आहे. सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयांनी यासंदर्भातील निकाल वेळोवेळी दिले आहेत. रमी हासुद्धा घोडेस्वारीप्रमाणे कौशल्य दाखवण्याचा खेळ आहे. त्यामुळे ही नोटीस अयोग्य आहे. आम्ही कायद्यानुसार जीएसटी आणि आयकर दिला आहे. आम्ही या नोटीसला योग्य पद्धतीने उत्तर देऊ अशी आम्हाला खात्री आहे. आम्हाला पाठवलेल्या नोटीसमध्ये २८ टक्के जीएसटीचा उल्लेख आहे जो नशीब आजमावणाऱ्या खेळांसाठी आणि लॉटरीसाठी आकारला जातो. मात्र ऑनलाइन कौशल्य दाखवणाऱ्या गेम्ससाठी १८ टक्के जीएसटी आकारला जातो,” असे म्हटलं आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत