राष्ट्रीय

घटस्फोटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय ; नात्यात सुधारणा न झाल्यास...

कौटुंबिक तणावातून जात असलेल्या जोडप्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

नवशक्ती Web Desk

घटस्फोटाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. नातेसंबंधात सुधारणा होण्याची शक्यता नसल्यास, पती-पत्नीने घटस्फोटासाठी सहा महिने प्रतीक्षा करण्याची गरज नाही. घटनेच्या कलम 142 मधील तरतुदींचा वापर करून जोडपे घटस्फोट घेऊ शकतात. सहा महिने वाट पाहण्याची गरज नसल्याचा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे कौटुंबिक तणावातून जात असलेल्या जोडप्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्याच्या कायद्यानुसार, पती-पत्नी घटस्फोट घेण्यास सहमत असल्यास, कौटुंबिक न्यायालय दोन्ही पक्षांना विचार करण्यासाठी आणि संबंध सुधारण्यासाठी सहा महिन्यांची वेळ देते. त्यामुळे अनेकांना घटस्फोटासाठी सहा महिने वाट पाहावी लागते. काही लोक सहा महिन्यांत घटस्फोटाबद्दल त्यांचे मत बदलतात. मात्र, आता याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सहा महिन्यांनंतर नात्यात सुधारणा न झाल्यास सहा महिने थांबण्याची गरज नाही. हे जोडपे लवकर घटस्फोट घेऊ शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश