राष्ट्रीय

लष्करी जवानाची आत्महत्या, तपास सुरू

Swapnil S

केंद्रपारा : ओदिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील डीआरडीओच्या रडार ऑब्झर्व्हेटरी एअर सर्व्हिलन्स युनिटमधील ३५ वर्षीय लष्करी जवानाने त्याच्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलिसांनी रविवारी सांगितले.

राज शेखरन असे लष्करी जवानाचे नाव असून तो तामिळनाडूचा रहिवासी आहे. रविवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास महाकालपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कियारबंका गावात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) संबंधित ठिकाणी कर्तव्यावर असताना ही घटना घडली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आणि त्याला जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

महालकपाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक बिमल कुमार मल्लिक यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. पुढील तपास सुरू आहे. तर सदर जवानाची रायफल जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस