पुरलेला मृतदेह पुराव्याकरिता आणला बँकेत; दिवंगत बहिणीच्या खात्यातून पैसे काढताना दमछाक (Photo-X)
राष्ट्रीय

पुरलेला मृतदेह पुराव्याकरिता आणला बँकेत; दिवंगत बहिणीच्या खात्यातून पैसे काढताना दमछाक

अधिकाऱ्यांनी भावाला पैसे देण्यास सातत्याने नकार दिल्याने हताश झालेल्या भावाने चक्क स्मशानातून बहिणीचा सापळा उकरून काढून बँकेत नेल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली.

Swapnil S

भुवनेश्वर : दिवंगत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी मिळण्यासाठी बँक खातेदाराने म्हणजे त्याच्या बहिणीने स्वत: हजर राहणे अनिवार्य आहे, असा आग्रह धरून बँक अधिकाऱ्यांनी भावाला पैसे देण्यास सातत्याने नकार दिल्याने हताश झालेल्या भावाने चक्क स्मशानातून बहिणीचा सापळा उकरून काढून बँकेत नेल्याची धक्कादायक घटना ओदिशामध्ये घडली.

बहिणीचा सापळा बँकेत नेणाऱ्या इसमाचे नाव जितू मुंडा असे असून ते दिवंगत बहिणीच्या खात्यातून सुमारे १९ हजार ३०० रुपये काढण्याची बँकेकडे परवानगी मागत होते. बँकेच्या कर्मचाऱ्यांना बहिणीच्या मृत्यूची माहिती देऊनही त्यांना परवानगी देण्यात आली नाही. त्यांच्या व्यवहाराला अधिकृत संमती देण्यासाठी बँक खातेदाराने म्हणजे त्यांच्या बहिणीने स्वतः प्रत्यक्ष उपस्थित असणे अनिवार्य आहे, असा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आग्रह धरला होता.

मृत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंडा यांने बँकेतील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्याकडे वारंवार विनंती केली. मात्र, त्याकडे बँकेतील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे जितू याने थेट बहिणीचा दफन केलेल्या अस्थी स्मशनातून बाहेर काढल्या. मृत महिलेच्या हाडाचा सापळा घेऊन तो बँकेत पोहोचला. जितू मुंडा यांनी दोन महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या बहीण कलारा यांच्या मृतदेहाचे दफन केले होते. जितू यांनी बहिणीच्या अस्थी बाहेर काढून ओडिशा ग्राम्य बँकेच्या मलिपोसी शाखेच्या दारात ठेवल्या.

जितू हे बँकेत सातत्याने जात होते, मात्र बँकेकडून वारंवार नकारघंटा मिळत असल्याने ते हताश झाले. जितू यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी दफन करण्यात आलेला बहिणीचा मृतदेह स्मशानातून बाहेर काढला. बहिणीच्या अस्थी बँकेत आणून बँकेतील अधिकाऱ्यांचा निषेध केला. या कृतीमुळे स्थानिक नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष त्वरित वेधले गेले. पाटणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पुन्हा दफन करण्यासाठी दियानाली गावात परत नेला.

या घटनेबाबत बँक प्रशासन किंवा पोलिसांकडून कोणताही अधिकृत प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. स्थानिकांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. दिवंगत बहिणीच्या खात्यातून पैसे काढण्यासंबंधीच्या योग्य कार्यपद्धतीबाबत बँक प्रशासनाने जितू यांना माहिती द्यायला हवी होती, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

मराठी भाषा सक्तीचे पाऊल अडखळले; प्रताप सरनाईक यांची माहिती

भोंदू अशोक खरात प्रकरण : पाच हजारांच्या अंगठीची विक्री ‘लाख’मोलात; SITकडून महिलेच्या नावाचा मोठ्या रकमेचा धनादेश जप्त

महाबळेश्वरात दुर्मिळ इंडोनेशियन ‘मलेओ’ पक्षी; स्थानिकांनी वाचवला जखमी पक्ष्याचा जीव

मुंबईत पाणीकपात; धरणांत फक्त २८.३५ टक्के पाणीसाठा

Mumbai : मिरा रोड चाकूहल्ला हे दहशतवादी कृत्य?