राष्ट्रीय

जम्मू-काश्मिरात काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे जागावाटप; प्रत्येकी तीन-तीन जागा

जम्मूच्या दोन जागांवर व लडाखच्या एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. त्याला नॅशनल कॉन्फरन्स पाठिंबा देईल, तर काश्मीरच्या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्स लढवणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीर व लडाखसाठी काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सचे जागावाटप पूर्ण झाले आहे, अशी घोषणा नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केली.

ते म्हणाले की, जम्मूच्या दोन जागांवर व लडाखच्या एका जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. त्याला नॅशनल कॉन्फरन्स पाठिंबा देईल, तर काश्मीरच्या तीन जागा नॅशनल कॉन्फरन्स लढवणार आहे. त्याला काँग्रेस पाठिंबा देणार आहे. अनंतनाग-राजौरी येथून मेहबुबा मुफ्ती, माजी खासदार मीर फयाज हे बारामुल्लातून निवडणूक लढवतील.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस