राष्ट्रीय

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केवळ १०५ तास कामकाज

१८ व्या लोकसभेच्या पहिले हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात २० बैठका झाल्या.

Swapnil S

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या पहिले हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात २० बैठका झाल्या. लोकसभा व राज्यसभेचे एकूण १०५ तास काम झाले. लोकसभेची उत्पादकता ५७.८७ टक्के, तर राज्यसभेची उत्पादकता ४१ टक्के नोंदली गेली. संसदेत चार विधेयके मांडण्यात आली. मात्र, एकही विधेयक मंजूर झाले नाही.

‘एक देश-एक निवडणूक’ हे बहुचर्चित विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाच्या छाननीसाठी ३९ सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीला संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत अहवाल द्यावा लागणार आहे.

लोकसभेत २० बैठका झाल्या, त्या ६२ तास चालल्या. लोकसभेची उत्पादकता ५७.८७ टक्के झाली. भारताच्या राज्यघटनेला ७५ वर्षे झाल्यानिमित्त १३ व १४ डिसेंबरला विशेष चर्चा झाली. तसेच शून्य प्रश्नोत्तराच्या काळात ६१ तारांकित प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरात कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा