राष्ट्रीय

देशात फक्त मोदींचीच हवा ;राज्यात भाजप ४० च्या पुढे जाणार : फडणवीस

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाच्या संदर्भात संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असून त्यावर योग्य त्या गोष्टी केल्या जातील

Swapnil S

पुणे : ‘सी व्होटर’च्या सर्व्हेमध्ये राज्यात महाविकास आघाडीला फायदा होणार असून महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र इन्कार केला आहे. “मी प्रत्येक सर्व्हेचा सन्मान करतो. पण कोणताही सर्व्हे असो, देशात फक्त मोदींचीच हवा असणार आहे. जनतेने ठरवले आहे, फक्त मोदींनाच निवडून द्यायचं. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही ४०च्या पुढे जाणार म्हणजे जाणारच,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

“अशा प्रकारच्या सर्व्हेला कोणताही आधार नसतो, पाच राज्यांचे सर्व्हे आठवा आणि निकालही आठवा,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. ‘सी व्होटर’च्या पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला १९ ते २१ जागा तर महाविकास आघाडीला २६ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला ३७ टक्के तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. यावर फडणवीस म्हणाले की, “ए, बी, सी, डी, ई किंवा झेड व्होटर असला तरी देशात फक्त मोदींची हवा आहे. जनतेने ठरवून टाकलं आहे, फक्त मोदींना मत द्यायचे. त्यामुळे लोकसभेमध्ये आम्ही ४० च्या पार जाणार.”

कोरोनावर प्रत्येकाने काळजी घ्यावी

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होत आहे. कोरोनाच्या संदर्भात संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असून त्यावर योग्य त्या गोष्टी केल्या जातील, असं फडणवीस म्हणाले. गेल्या काही वर्षांमध्ये लोकही शिकलेली आहेत. यामध्ये सर्वांनी त्रास सहन केला आहे. त्यामुळे किमान काळजी घ्यावी. सध्या राज्यामध्ये काळजी करण्यासारखी स्थिती नसली तरी काळजी घेण्यासारखी स्थिती आहे. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठक घेतली असून योग्य त्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत. कोरोना बाबत लागणारी सर्व यंत्रणा सूचना सुसज्ज असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव फार वाढणार नाही अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी