राष्ट्रीय

फूट पाडणाऱ्यांनाच गणेशपूजनाचा त्रास होतो : पंतप्रधान मोदी

फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबणाऱ्या इंग्रजांना गणेशोत्सवाचा तिरस्कार वाटत असे. आजही समाजात फूट पाडण्यात मग्न असलेल्या सत्तेच्या भुकेल्यांना गणेशपूजनाचा त्रास होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Swapnil S

भुवनेश्वर : फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबणाऱ्या इंग्रजांना गणेशोत्सवाचा तिरस्कार वाटत असे. आजही समाजात फूट पाडण्यात मग्न असलेल्या सत्तेच्या भुकेल्यांना गणेशपूजनाचा त्रास होत आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी केलेल्या गणेशपूजेनंतरच्या टीकेचा समाचार घेतला.

मी गणेशपूजेत सहभागी झालो म्हणून काँग्रेसचे लोक आणि तिची परिसंस्था संतप्त झाल्याचे तुम्ही पाहिलेच असेल, असे नमूद करत पंतप्रधानांनी, या लोकांनी कर्नाटकात गणपतीला तुरुंगात टाकले, असा हल्लाबोल केला.

गणेशोत्सव हा आपल्या देशासाठी केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर स्वातंत्र्य चळवळीत या उत्सवाने महत्त्वाची भूमिका बजावली होती, असेही मोदी यांनी सांगितले.

Mumbai : अनधिकृत फेरीवाल्यांची तक्रार आता व्हॉट्सॲपवर; BMC ची नवी सुविधा सुरू

NEET UG 2026 Re-Exam : परीक्षेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २१ जूनचा मेगाब्लॉक रद्द

Mumbai : पावसाळ्यासाठी पश्चिम रेल्वे सज्ज; ट्रॅक सर्किट बिघाड रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

NEET पुनर्परीक्षा होईपर्यंत Telegram वर बंदी; केंद्राच्या निर्णयाविरोधात कंपनीची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

'पास करून देतो' म्हणत विद्यार्थिनींशी गैरवर्तन; संतप्त पालकांकडून शिक्षकाला चोप