राष्ट्रीय

४ लाख हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : देशातील ८ राज्यांत ४.०९ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती केली जात आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, आंध्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, ओदिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड व तामिळनाडूत सेंद्रीय पद्धतीने शेती केली जात आहे. २०१९-२० पासून केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. भारतीय प्राकृतिक कृषी पद्धती अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली आहे.

आंध्रातील १ लाख हेक्टर, मध्य प्रदेशात ८५ हजार हेक्टर, छत्तीसगडमध्ये ८५ हजार हेक्टर, केरळात ८४ हजार हेक्टर, ओदिशात २४ हजार हेक्टर, हिमाचल प्रदेशात १२ हजार हेक्टर, झारखंडमध्ये ३४०० व तामिळनाडूत २ हजार हेक्टर जमिनीवर सेंद्रीय शेती केली जाते.

नैसर्गिक शेती ही रसायनमुक्त असते. यात स्थानिक संसाधनाचा वापर केला जातो. यात गाईचे शेण, गोमूत्र आदींचा वापर केंद्रीय शेतीत केला जातो.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस