एक्स @sharadpareek
राष्ट्रीय

मोदी-राजनाथ सिंह बैठकीत पहलगामवर चर्चा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात सोमवारी महत्त्वाची बैठक झाली.

Swapnil S

दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात सोमवारी महत्त्वाची बैठक झाली. मोदींच्या निवासस्थानी झालेल्या ४० मिनिटांच्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर, मोदी भारत सरकार पुढे कोणते महत्त्वाचे पाऊल उचलणार याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. तत्पूर्वी, राजनाथ सिंह यांनी रविवारी सीडीएस अनिल चौहान यांच्याशी बैठक घेतली. मोदी यांनी यापूर्वीच दहशतवाद संपवण्याबद्दल भाष्य केले आहे. रविवारच्या 'मन की बात'मध्येही त्यांनी पहलगाम हल्ल्यातील दोषींना सोडणार नाही, पीडितांना न्याय देणारच याचा पुनरुच्चार केला. दरम्यान, राजनाथ सिंह यांची मोदींसोबत पहलगाममधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथसिंह सतत बैठका घेत आहेत. त्यांनी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्याशी भेट घेतली. यानंतर, सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत एक बैठकही झाली. संरक्षण मंत्र्यांना भेटण्यापूर्वी, लष्करप्रमुखांनी पहलगामला भेट दिली होती आणि श्रीनगरमधील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या चौकीवर केलेल्या गोळीबार आणि दहशतवाद्यांच्या घुसखोरीबद्दल माहिती घेतली. राजनाथ सिंह सर्व उच्च अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत आणि पंतप्रधानांसोबत बैठक घेत आहेत. अशा परिस्थितीत, एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

पाकिस्तानकडून सलग चौथ्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत सलग चौथ्या दिवशी पूंछ आणि कुपवाडा नियंत्रणरेषेवर गोळीबार केला. भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

याबाबत संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, २७-२८च्या मध्यरात्री पाकिस्तानच्या लष्कराने छोट्या शस्त्रांनी नियंत्रणरेषेवर गोळीबार केला. सलग चौथ्या दिवशी हा गोळीबार करण्यात आला.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस