संग्रहित छायाचित्र  ANI
राष्ट्रीय

पाकिस्तान वाईट शेजारी - एस. जयशंकर ; दहशतवादाविरोधात कारवाईचा भारताला पूर्ण अधिकार!

भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत.

Swapnil S

चेन्नई : भारताला वाईट शेजारी लाभला असून तो सतत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम करतो, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी काय करायला हवे याचा निर्णय भारत स्वत: घेईल, इतरांकडून त्याबाबत सल्ला घेण्याची भारताला गरज नाही, असे एस. जयशंकर म्हणाले.

आयआयटी मद्रासमधील एका कार्यक्रमात शुक्रवारी एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला सोडावे अशी विनंती तुम्ही करू शकत नाही, तसेच आमच्या देशात दहशतवादही पसरवू शकत नाही, असे जयशंकर यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितले आहे.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर एस. जयशंकर म्हणाले, दहशतवादाविरोधात कारवाई करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. आपल्या सुरक्षेसाठी जे काही करावे लागेल, ते आपण करू. दहशतवादापासून आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे.

दिल्लीत तीन दिवसांचा वाहतूक संप सुरू; दरवाढीसाठी वाहतूकदार आक्रमक

काजू पिकणार कोकणात, निर्यात केंद्र मात्र कोल्हापुरात! चंदगडमध्ये केंद्र उभारण्याचा प्रस्ताव

सर्व उच्च न्यायालयांनी ऑनलाइन सुनावणी घ्यावी; सरन्यायाधीशांची विनंती

तमिळनाडूत पुन्हा ‘वंदे मातरम’वरून वाद; शपथविधी कार्यक्रमात तमिळ गीताऐवजी ‘वंदे मातरम’ आधी वाजले

Weather Update : होरपळ सुरूच; ७५ टक्के देश तापलाय