राष्ट्रीय

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान होणार

भाजपसहित अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे

वृत्तसंस्था

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून पहिल्याच दिवशी संसद भवनात दोन्ही सभागृहांतील सदस्य राष्ट्रपतीपदासाठी मतदान करतील. भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात सर्व विरोधकांचे निवडलेले उमेदवार यशवंत सिन्हा यांचे आव्हान असणार आहे. वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, तसेच महाराष्ट्रातील शिंदे गटातील आमदारांनी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर खासदारांनी दबाव आणल्यामुळे शिवसेनेनेही मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे मान्य केले आहे. भाजपसहित अन्य पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. सोमवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, विद्यमान संसद भवनातील हे अखेरचे अधिवेशन असेल.

आता संसदेच्या नव्या इमारतीमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याचे केंद्रीय नागरी विकासमंत्री हरदीप पुरी यांनी जाहीर केले आहे. असंसदीय शब्दांवरून वातावरण तापल्यानंतर संसदेच्या आवारात निदर्शने, धरणे धरण्यास मनाई करणाऱ्या परिपत्रकावरूनही वादंग माजला असून, त्याविरोधातही विरोधक अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आक्रमक होण्याची शक्यता आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत असेल. एकूण १८ सत्रांमध्ये लोकसभेत मंजुरीसाठी २९ विधेयके मांडली जाणार असून, त्यात २४ नवीन विधेयके असतील.

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

जीएसटी २ लाख कोटी; सप्टेंबरमध्ये अप्रत्यक्ष कर संकलन १५ टक्क्यांनी वाढले

उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांचा आज ‘नो यूपीआय डे’; डिजिटल पेमेंटला एक दिवसाचा ‘ब्रेक’; स्कॅनरवर काळे कापड टाकून निषेध

गस्तीवरच्या 'पोलीस दीदी'ने थप्पड लगावल्याचा राग, तरुणाने वर्दीवर उचलला हात; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, VIDEO

दिवाळीत म्हाडा कोकणची सोडत शक्य; २,५०० घरांचा समावेश