नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट बँकेचे अर्धवेळ अकार्यकारी अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे.
१५ मार्चपासून पेटीएम पेमेंट बँकेला नवीन ठेवी व कर्ज देण्यास आरबीआयने बंदी घातली आहे. कारण बँकेने आवश्यक त्या नियमांची अंमलबजावणी केली नाही. पेटीएम पेमेंट बँकेने संचालक मंडळात फेरबदल केले आहेत. सेंट्रल बँकेचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, माजी आयएएस अधिकारी देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग, माजी आयएएस अधिकारी रजनी सेखरी सिबल आदींची नियुक्ती संचालक मंडळावर केली.
पेटीएम ब्रँडची मालकी वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडची आहे. विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे कंपनीने शेअर बाजाराला कळवले आहे. कंपनीचा संपूर्ण कारभार आता नवीन संचालक मंडळ करणार आहे.