केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेल निर्यात शुल्कात बदल; १ जूनपासून नवे दर लागू संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

केंद्राचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेल निर्यात शुल्कात बदल; १ जूनपासून नवे दर लागू

Petrol-Diesel Export Duty : कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि ATF यांच्या आंतरराष्ट्रीय सरासरी किमतींचा आढावा घेतल्यानंतर नवीन शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यात शुल्कात पुन्हा एकदा बदल करत मोठा निर्णय घेतला आहे. १ जूनपासून लागू होणाऱ्या नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) निर्यातीवरील शुल्कात सुधारणा करण्यात आली आहे. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि इंधन दरातील चढ-उतार लक्षात घेऊन केंद्राने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशांतर्गत पेट्रोल-डिझेलवरील करात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल, डिझेल आणि ATF वर नवे शुल्क

सरकारी अधिसूचनेनुसार, पेट्रोल निर्यातीवर आता प्रति लिटर १.५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. डिझेल निर्यातीवरील शुल्क प्रति लिटर १३.५ रुपये करण्यात आले आहे. तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) निर्यातीवर प्रति लिटर ९.५ रुपये शुल्क लागू करण्यात आले आहे.

देशांतर्गत इंधनावरील करात कोणताही बदल नाही

देशांतर्गत विक्री होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात सरकारने कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असून किरकोळ इंधन दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.

जागतिक दरांचा आढावा घेऊन निर्णय

कच्चे तेल, पेट्रोल, डिझेल आणि ATF यांच्या आंतरराष्ट्रीय सरासरी किमतींचा आढावा घेतल्यानंतर नवीन शुल्क निश्चित करण्यात आले आहे. याआधी १६ मे रोजी सरकारने पेट्रोल निर्यातीवर प्रति लिटर ३ रुपये विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) लागू केले होते. त्याचवेळी डिझेलवरील शुल्क १६.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले होते.

निर्यात शुल्क लागू करण्यामागचे कारण काय?

पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. त्यानंतर २७ मार्च २०२६ रोजी केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवर निर्यात शुल्क लागू केले.

देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा आणि अत्याधिक निर्यात रोखता यावी, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीनुसार दर पंधरवड्याला या धोरणाचा आढावा घेतला जात आहे.

गेल्या दोन महिन्यांत शुल्कात टप्प्याटप्प्याने कपात

मार्च आणि एप्रिल महिन्यात जागतिक परिस्थितीमुळे डिझेल आणि ATF वरील निर्यात शुल्कात मोठी वाढ करण्यात आली. २६ मार्च रोजी डिझेल निर्यात शुल्क २१.५ रुपये प्रति लिटर होते. त्यानंतर ११ एप्रिल रोजी ते वाढवून ५५.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले होते. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शुल्कात टप्प्याटप्प्याने कपात करण्यात आली. त्याचप्रमाणे ATF वरील शुल्कही २९.५ रुपयांवरून ४२ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र आता ते कमी करून ९.५ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.

Navi Mumbai : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा TTC औद्योगिक क्षेत्राला फटका; वाहतूक, उत्पादन आणि निर्यात खर्चात वाढ, लघुउद्योग आर्थिक दबावाखाली

Pune : १८ महिला कॅडेट्ससह ३५३ जणांची यशस्वी लष्करी झेप; NDA च्या १५० व्या तुकडीचा दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा

Mumbai : सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा खीळ; पहिल्या गर्डर लाँचिंगला विलंब, १५ ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रायश्चित्त घ्यावे! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

बारामती बसस्थानक स्वच्छतेत पहिले; पटकावले एक कोटींचे बक्षीस