राष्ट्रीय

... तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता! RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे संकेत

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यत्ययाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. आतापर्यंत सरकारने या दरवाढीचा मोठा भार स्वतः सोसला आहे, मात्र हे संकट असेच कायम राहिल्यास इंधन दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे, असे संकेत 'भारतीय रिझर्व्ह बँके'चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले.

Swapnil S

झुरिच : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या जागतिक व्यत्ययाचा परिणाम भारतावर दिसू लागला आहे. आतापर्यंत सरकारने या दरवाढीचा मोठा भार स्वतः सोसला आहे, मात्र हे संकट असेच कायम राहिल्यास इंधन दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला जाण्याची शक्यता आहे, असे संकेत 'भारतीय रिझर्व्ह बँके'चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि स्विस नॅशनल बँकेने संयुक्तपणे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चलन प्रणालीवरील १२ व्या उच्चस्तरीय परिषदेत ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असतानाही सरकारने आतापर्यंत इंधनाचे दर स्थिर ठेवले आहेत.

करांमध्ये कपात करून आणि गॅससारख्या नियंत्रित वस्तूंच्या किमतीत किरकोळ वाढ करून जनतेला दिलासा देण्यात आला आहे.

पुरवठा साखळीतील अडथळा देशासाठी धोकादायक!

भारताच्या ग्राहक किंमत निर्देशांकात (सीपीआय) अन्नाचा वाटा सुमारे ४० टक्के असल्याने पुरवठा साखळीतील अडथळे देशासाठी धोकादायक असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. या जागतिक आणि देशांतर्गत बदलत्या परिस्थितीनुसार पतधोरण लवचिक ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; पावसाअभावी शेतकरी हवालदिल, खरीप हंगाम हातातून गेल्याने नैराश्य

भाईंदरमध्ये महापालिकेत पत्रकारांना धक्काबुक्की; भाजप नगरसेवकांवर मारहाणीचे आरोप, पत्रकारांचे आंदोलन