राष्ट्रीय

औद्योगिक क्षेत्रीय विकास कार्यक्रमात पीयूष गोयल पंतप्रधानांबद्दल म्हणाले...

राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रीय विकास कार्यक्रम आयोग यांच्या वतीने आयोजित गुंतवणूकदारांच्या एका गोलमेज परिषदेला संबोधित केले

वृत्तसंस्था

येत्या काही वर्षांत संपूर्ण जग पंतप्रधान गतिशक्तीच्या उदाहरणाचे अनुकरण करेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले.

ते म्हणाले की, ज्या लोकांना औद्योगिक युनिट्सची सुरुवात करायची आहे, त्यांनी या योजनेचा उपयोग करावा. पीएम गतिशक्ती ही योजना परिवर्तन घडवून आणेल. कोची येथे राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रीय विकास कार्यक्रम आयोग यांच्या वतीने आयोजित गुंतवणूकदारांच्या एका गोलमेज परिषदेला संबोधित करत होते. केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी गुंतवणूकदारांना केरळ राज्यातील नैसर्गिक वातावरणाचा उद्योग उभारणीसाठी वापर करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारचा उद्देश व्यवसाय सुलभता आणणे आणि उचित खर्च करून उद्योग उभारणे, हा आहे. ते पुढे म्हणाले की, या बाबतीत पंतप्रधानांचे लक्ष्य स्पष्ट आहे. केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव म्हणाले की, वर्षभरात एक लाख उद्योग स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बंगळुरू-कोची इंडस्ट्रियल कॉरिडॉर तिरुअनंतपुरमपर्यंत वाढवण्याची विनंतीही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश