राष्ट्रीय

‘समुद्रयान मत्स्य’ समुद्राचा तळ गाठणारअवकाश काबीज केल्यानंतर समुद्रमंथनाची योजना

सुरुवातीला ५०० मीटर खोलीवर चाचण्या घेण्यात येणार आहेत

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : अवकाशात भरारी मारून चंद्राला कवेत घेतल्यानंतर भारताने आता समुद्रमंथन करून कोबाल्ट, निकेल आणि मँगनीजसारखे मूल्यवान धातू शोधण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत पाणबुडीसदृश मत्स्य नावाचे समुद्रयान समुद्रात ६ हजार मीटर खोलीवर पाठवण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे समुद्रयान पूर्णत: भारतीय बनावटीचे आहे.

गेल्या दोन वर्षांपासून या यानाची उभारणी सुरू आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीस याची पहिली चाचणी चेन्नईजवळ बंगालच्या उपसागरात घेण्यात येणार आहे. अलीकडेच अॅटलांटिक महासागरात बुडालेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा स्फोट होऊन त्यातील सर्व क्रू सदस्य मृत झाले होते. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञ सावध झाले असून समुद्रयानाच्या कसून चाचण्या करीत आहेत. सुरुवातीला ५०० मीटर खोलीवर चाचण्या घेण्यात येणार आहेत.

चाचण्यांनंतर प्रत्यक्ष मंथनाला २०२६ साली सुरुवात होणार आहे. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्स आणि चीन या देशांनीच अशा पाणबुड्या तयार केल्या आहेत. अशी माहिती अर्थ सायन्स मंत्रालयाचे सचिव रविचंद्रन यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी एकूण ४०७७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही विशेष पाणबुडी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी संस्था उभारत आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन