पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या... 
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींना ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ओमान’ प्रदान; मोदी म्हणाले, "हा सन्मान भारताच्या...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओमानच्या अधिकृत दौऱ्यात भारत–ओमान संबंध मजबूत केल्याबद्दल ‘ऑर्डर ऑफ ओमान’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. ओमानमधील भारतीय समुदायाचेही त्यांनी कौतुक केले.

किशोरी घायवट-उबाळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी (दि.१८) ओमानचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘ऑर्डर ऑफ ओमान’ (Order of Oman) प्रदान करण्यात आला. ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांनी भारत-ओमान द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यात मोदींच्या योगदानाची दखल घेत हा मान बहाल केला. सध्या पंतप्रधान मोदी हे ओमानच्या दौऱ्यावर आहेत.

‘ऑर्डर ऑफ ओमान’ हा सुलतानतर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान असून यापूर्वी ब्रिटनच्या माजी महाराणी एलिझाबेथ द्वितीय, जपानचे सम्राट अकिहितो, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला आणि जॉर्डनचे राजा अब्दुल्ला द्वितीय यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया - सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा ओमान दौरा त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्याचा अंतिम टप्पा होता. याआधी त्यांनी जॉर्डन आणि इथिओपियाला भेट दिली होती. विशेष म्हणजे, ओमानमधील सन्मानाच्या एक दिवस आधीच इथिओपियाने पंतप्रधान मोदींना ‘ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "शतकानुशतके आपल्या पूर्वजांमध्ये परस्पर संबंध होते. समुद्री व्यापाराच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडले गेले होते. अरबी समुद्राने आपल्या दोन राष्ट्रांमधील दृढ सेतूचे काम केले आहे. हा सन्मान मी भारताच्या जनतेला समर्पित करतो."

पुढे ते म्हणाले, "मांडवीपासून मस्कतपर्यंत प्रवास करून भारत-ओमान संबंधांची पायाभरणी करणाऱ्या आपल्या पूर्वजांनाही मी हा सन्मान अर्पण करतो. तसेच शतकानुशतके झालेल्या सागरी देवाणघेवाणीतून दोन्ही राष्ट्रांच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व समुद्रवीरांनाही हा सन्मान समर्पित आहे.”

संस्कृतीची मजबूत पायाभरणी

दरम्यान, मस्कतमध्ये भारतीय समुदाय आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी भारतीयांचे कौतुक केले. “ओमानमधील भारतीय समुदाय हा सहअस्तित्व आणि सहकार्याचा जिवंत आदर्श आहे,” असे ते म्हणाले. “आज आपण सर्वजण एका कुटुंबाप्रमाणे येथे एकत्र आलो आहोत. आपण आपल्या देशाचा, आपल्या टीम इंडियाचा उत्सव साजरा करत आहोत,” असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या सांस्कृतिक ओळखीवर भाष्य करताना मोदी म्हणाले की, “भारताची विविधता ही आपल्या संस्कृतीची मजबूत पायाभरणी आहे,” आणि हाच अनेकतत्ववाद भारताच्या जागतिक ओळखीचा आधार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Pune : बनावट औषधप्रकरणी इंडुकेअरचे परवाने रद्द; उत्पादन, पॅकिंग, तपासणी व वितरण तातडीने बंद करा, FDA चे आदेश

पेपरफुटीला कठोर शिक्षा; १० वर्षे कैद, १० कोटी दंड; सुधारणांऐवजी शिक्षेवर भर; व्ही. राधा समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर

भाजप-अकाली दलाची पुन्हा युती; पंजाबात सत्ता आल्यास अकाली दलाचा मुख्यमंत्री: अमित शहा

शतकमहोत्सवी संमेलनाध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने निर्णय

SIR विरोधात देशव्यापी आंदोलन; २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार दुसरी फेरी