'गुलामगिरीच्या मानसिकतेतून' देशाला मुक्त करू : पंतप्रधानांनी दिली ग्वाही  
राष्ट्रीय

'गुलामगिरीच्या मानसिकतेतून' देशाला मुक्त करू : पंतप्रधानांनी दिली ग्वाही

येत्या १० वर्षांत देशातून 'गुलामगिरीची मानसिकता' पूर्णपणे मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. ते म्हणाले की, जेव्हा भारत २-३ टक्के विकासासाठी झगडत होता, तेव्हा 'हिंदू विकास दर' या शब्दाचा वापर केला जात होता.

Swapnil S

नवी दिल्ली : येत्या १० वर्षांत देशातून 'गुलामगिरीची मानसिकता' पूर्णपणे मुक्त करण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. ते म्हणाले की, जेव्हा भारत २-३ टक्के विकासासाठी झगडत होता, तेव्हा 'हिंदू विकास दर' या शब्दाचा वापर केला जात होता. "मॅकलेची नीती, ज्याने भारतात मानसिक गुलामगिरीचे बीज पेरले, त्याला २०२५ मध्ये २०० वर्षे पूर्ण होतील. याचा अर्थ आपल्याकडे १० वर्षे बाकी आहेत. म्हणून, याच १० वर्षांत आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त केले पाहिजे. देशाच्या विकासाला तेथील लोकांच्या श्रद्धेशी, त्यांच्या ओळखीशी जोडणे... हे वसाहतवादाच्या मानसिकतेचे प्रतीक होते."

भारताच्या मंद विकासाचे कारण हिंदू संस्कृती आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगून ते म्हणाले, "आजचे बुद्धीजीवी, जे प्रत्येक गोष्टीत जातीयवाद शोधत राहतात, त्यांना 'हिंदू विकास दर' या शब्दाच्या वापरात जातीयवाद दिसला नाही. त्यांच्या काळात हा शब्द पुस्तके आणि संशोधन लेखांचा भाग बनवला गेला."

भारताचे मॉडेलः उच्च विकास, कमी महागाई

भारत हे उच्च विकास आणि कमी महागाईचे मॉडेल आहे, असे सांगून त्यांनी नमूद केले की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताने गाठलेला ८.२ टक्के विकास दर हे दर्शवतो की, भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा 'विकास चालक' बनत आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर