पाटणा : माझ्या आईचा अपमान झाल्याप्रकरणी मी राजद व काँग्रेसला माफ करेन. पण, बिहारची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या ‘मतदान अधिकार यात्रा’दरम्यान त्यांच्या आईचा अपमान करण्यात आल्याने मला वेदना झाल्याचे सांगितले.
दरभंगा येथे झालेल्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधानांच्या दिवंगत मातोश्रींबाबत अपमानास्पद वक्तव्य झाले होते.
ज्यांना भारतमातेचाही अपमान करण्याची सवय आहे, त्यांच्यासाठी माझ्या आईचा अपमान काहीच नाही. अशांना शिक्षा झाली पाहिजे. माझ्या आईचा राजकारणाशी काही संबंध नव्हता. मग तिची काय चूक होती? तिचा अपमान का झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.