मोदींना अमेरिकेचे निमंत्रण; मार्को रुबिओंनी घेतली पंतप्रधानांची भेट (Photo-X/@narendramodi)
राष्ट्रीय

मोदींना अमेरिकेचे निमंत्रण; मार्को रुबिओंनी घेतली पंतप्रधानांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात शनिवारी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

Swapnil S

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात शनिवारी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत भारत-अमेरिका संबंधांवर विशेषतः संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यावर भर देण्यात आला.

कोलकात्याच्या छोट्या दौऱ्यानंतर दिल्लीत दाखल होताच, रुबिओ यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने रुबिओ यांनी पंतप्रधान मोदींना लवकरच अमेरिकेला भेट देण्याचे अधिकृत निमंत्रण दिले आहे.

पंतप्रधान मोदींनी 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले की, "अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेऊन आनंद झाला. भारत आणि अमेरिका जागतिक कल्याणासाठी एकत्रितपणे काम करणे सुरूच ठेवतील."

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा सुरक्षा आणि शिक्षण यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच, पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.

गेल्या वर्षाच्या मध्यापासून भारत-अमेरिका संबंधांत आलेल्या अडथळ्यांना दूर करून द्विपक्षीय संबंध पुन्हा बळकट करणे, हा रुबिओ यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे मानले जात आहे.

Mumbai : विजेच्या मागणीचा उच्चांक; द. मुंबईत वारंवार बत्ती गुल, गिरगाव, दादर, वडाळ्यात नागरिक हैराण

भारत सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार होईल - राजनाथ सिंह

'झुरळां'ची गळचेपी; कॉकरोच जनता पार्टीचे अकाऊंटस ब्लॉक

Weather Update : केरळात मान्सूनपूर्व सरी

Bakri Eid 2026 : गोमांस विक्री केल्यास मोक्का लावण्याचा इशारा