राष्ट्रीय

काँग्रेसच्या 'गरिबी हटाव'वर मोदींचा हल्लाबोल; केवळ १२ वर्षांत ५० कोटी लोक गरिबीमुक्त

काँग्रेसने दशकानुदशके 'गरिबी हटाओ'चा नारा दिला, मात्र आपल्या सरकारने १२ वर्षांत ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. सरकारची इच्छाशक्ती आणि गरीबांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे लाखो लोकांचे जीवन बदलल्याचे मोदी म्हणाले.

Swapnil S

वैशाली : काँग्रेसने दशकानुदशके 'गरिबी हटाओ'चा नारा दिला, मात्र आपल्या सरकारने १२ वर्षांत ५० कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केला. सरकारची इच्छाशक्ती आणि गरीबांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे लाखो लोकांचे जीवन बदलल्याचे मोदी म्हणाले.

वैशाली येथील जाहीर सभेत मोदी म्हणाले, की ८० कोटी लोकांना मोफत धान्य, लाखो कुटुंबांना पक्की घरे आणि मोफत उपचारांची सुविधा देऊन गरीबांना दिलासा दिला आहे. बिहारमध्ये एनडीए सरकारपूर्वी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीची चर्चा होत होती; आता गुंतवणूक आणि गुन्हेगारांवरील कारवाईची चर्चा होते.

मोदी यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण केले. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सन्मानार्थ या पुलाला 'नितीश सेतू' असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांनी खुल्या वाहनातून 'गमछा' फिरवत सभास्थळी दिमाखदार प्रवेश केला.

नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमधील वैशाली जिल्ह्यात सुमारे ३४,००० कोटी रुपयांच्या २२७ पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले.

'विकसित भारत'साठी पुढील २० वर्षे निर्णायक

खरगपूर : गेल्या १२ वर्षांत भारताने जुन्या मानसिकतेच्या मर्यादा मोडून देशाची क्षमता विकसित करण्यात, नव्या संधी निर्माण करण्यात आणि गरिबांना सक्षम करण्यात यश मिळवले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. आयआयटी खरगपूरच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मोदी म्हणाले की, विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी पुढील दोन दशके महत्त्वाची आहेत. गरिबी ही कायमस्वरूपी समस्या असल्याची मानसिकता बदलण्यासाठी सरकारने गेल्या १२ वर्षांत विविध उपक्रम राबविले. सेमीकंडक्टर आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचा उल्लेख त्यांनी केला. विद्यार्थ्यांनी 'राष्ट्र प्रथम' हा मंत्र स्वीकारून २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : शासकीय कर्मचाऱ्यांना घरदिलासा; वांद्रे, पवई, घाटकोपरला ५०० नवी सेवा निवासस्थाने

Mumbai : १० महिन्यांत ७ खून, उपनगरीय लोकलमध्ये हत्यासत्र; पश्चिम रेल्वेवर ५, तर मध्य रेल्वेवर २ घटना

Mumbai : पवई तलावावर देशातील सर्वांत भव्य म्युझिकल फाऊंटन; ३० कोटींच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन, शिवरायांची शौर्यगाथा साकारणार

तारळी प्रकल्पाला दणका; सावरघर येथील उत्खनन थांबविण्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निर्देश

मेट्रो स्थानकांच्या नामकरणासाठी समिती; मुख्यमंत्री फडणवीस अध्यक्ष, एकनाथ शिंदे सहअध्यक्ष