पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड 
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हैसूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील भारतीय हवाई दलाच्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते लालित महालमधील जयचमारराजा वाडियार हेलिपॅडवरच थांबविण्यात आले.

Swapnil S

म्हैसूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हैसूर दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील भारतीय हवाई दलाच्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते लालित महालमधील जयचमारराजा वाडियार हेलिपॅडवरच थांबविण्यात आले. मोदी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कोसमॉस-म्हैसूर तारांगणाच्या उद्घाटनासाठी म्हैसूरमध्ये दाखल झाले होते. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासाठी हवाई दलाची तीन हेलिकॉप्टर्स ताफ्याचा भाग म्हणून आली होती आणि ती जयचमारराजा वाडियार हेलिपॅडवर उतरली होती.

कार्यक्रम मात्र, पंतप्रधान आटोपून ताफ्याची निघण्याची तयारी सुरू असताना, एका हेलिकॉप्टरात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आले आणि ते उड्डाण करू शकले नाही. त्यानंतर मोदी आणि ताफ्यातील इतर सदस्य इतर दोन हेलिकॉप्टर्सपैकी एकामधून पुढील प्रवासासाठी रवाना झाले. बिघाड झालेले हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच थांबवून ठेवण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हेलिकॉप्टरची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले. विमानात आलेली तांत्रिक अडचण दूर करून ते पुढील ऑपरेशनसाठी योग्य बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, म्हैसूरच्या स्थानिक पोलिसांनी हेलिपॅड परिसर कॉर्डन केला असून थांबवलेल्या हेलिकॉप्टरला कडक सुरक्षा पुरवली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai CNG Price Hike: आता सीएनजीही महाग; किलोमागे १.५० वाढ, नवा दर ९१.५० रुपये

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा