महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी 
राष्ट्रीय

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील प्रत्येक अडथळा दूर केला जाईल, या निर्णयाच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाची अंमलबजावणी रोखता येणार नाही, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

Swapnil S

नवी दिल्ली: लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीतील प्रत्येक अडथळा दूर केला जाईल, या निर्णयाच्या विरोधात असलेल्या राजकीय पक्षांना महिला आरक्षणाची अंमलबजावणी रोखता येणार नाही, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केला.

संसदेच्या पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी 'एक्स' वर व्हिडिओ संदेश जारी केला. देशातील 'नारी शक्ती'ला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला सक्षमीकरणाचा आमचा संकल्प अढळ आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर केला जाईल, अशी ग्वाही देशातील प्रत्येक महिलेला देऊ इच्छितो, या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्यांचे मनोबल उंचावलेले आहे. आमचे धैर्य अटळ आणि निर्धार ठाम आहे. महिला आरक्षणाला विरोध करणारे पक्ष महिलांचा संसद आणि विधानसभांमधील सहभाग वाढविण्यापासून त्यांना रोखू शकणार नाहीत. ही केवळ वेळेची बाब आहे. महिलांना विधिमंडळांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मीही आहे. अनेक महिला या विषयावर माझ्याशी संवाद साधत आहेत. देशातील शंभर टक्के महिलांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत, असेही मोदी म्हणाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत

रात्रीचा भात उरलाय? फोडणीचा भात न करता बनवा हॉटेलसारखी बिर्याणी; रेसिपी अगदी सोपी

Mumbai : लोकल प्रवाशांची गैरसोय होणार! मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही दुरुस्तीची कामे, वाचा सविस्तर