Car Driver And Police Viral Video Social Media
राष्ट्रीय

कार चालकाचा नादच खुळा! फिल्मी स्टाईलने पोलिसांना दिला चकवा, Video पाहून चक्रावून जाल

पोलिसांचा आणि कार चालकाचा हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

Naresh Shende

पोलिसांच्या एका व्हायरल व्हिडीओनं सोशल मीडियावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आरोपीने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी फिल्मी स्टाईलने धूम ठोकल्याचे अनेक व्हिडीओ आपण चित्रपटात पाहिले आहेत. पण उत्तर प्रदेशच्या गाजियाबादच्या महामार्गावर पोलिस आणि कार चालकामध्ये धूम स्टाईलने रंगलेली खरीखुरी रेस पाहायला मिळाली आहे.

पोलीस कार चालकाला पकडण्यासाठी पाठलाग करत असातनाच त्याने कारचा रिव्हर्स गिअर टाकून पलायन केलं. पोलिसांचा आणि कार चालकाचा हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, उत्तरप्रदेशच्या गाजियाबाद येथील महामार्गावर पोलीस एका कार चालकाचा पाठलाग करत आहेत. पोलिसांना पाहताच त्या कार चालकाने क्षणाचाही विलंब न लावता रिव्हर्स गिअर टाकून कार पळवली. त्यानंतर पोलिसांनी त्या कार चालकाला पकडले की नाही, हे या व्हिडीओत दिसत नाहीय. ४२ सेकंदांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून हजारो व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन