राष्ट्रीय

तिरुपती-तिरुमला देवस्थान परिसरात राजकीय भाषणांना बंदी; टीटीडी देवस्थानचा निर्णय

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) देवस्थानच्या परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घातली आहे.

Swapnil S

अमरावती : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) देवस्थानच्या परिसरात राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घातली आहे.

‘टीटीडी’ने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. राजकारण्यांसह काही लोकांनी दर्शनानंतर मंदिर परिसराजवळ मीडियासमोर राजकीय किंवा प्रक्षोभक विधाने केली होती. त्यामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावली आहे. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य आणि आध्यात्मिक शांततेचे रक्षण करण्यासाठी द्वेषपूर्ण भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वांना या निर्णयाचा आदर करण्याचे आवाहन ‘टीटीडी’ने केले असून उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. दरम्यान, हा नियम बऱ्याच काळांपासून लागू आहे. उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत, असे आंध्र प्रदेशचे माजी मुख्य सचिव एल. व्ही. सुब्रमण्यम यांनी सांगितले.

BEST बसचालकांची बेदरकारी वाढली; ८९८ जणांवर कारवाई, पैकी ७८९ कंत्राटी चालक, पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Mumbai : कुर्ल्यात अतिक्रमणांपासून मुक्ती; बेकायदा बांधकामे, स्टॉल जमीनदोस्त, एल विभागाची कारवाई

सीईटी परीक्षेचीही SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संजुक्ता पराशर बनल्या ‘कोब्रा’ दलाच्या IG; कमांडो दलाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

समान नागरी कायद्याला JDU ची सशर्त तयारी