राष्ट्रीय

संभलमध्ये दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स लावणार; नुकसानभरपाईही वसूल करणार

संभलमध्ये हिंसाचारादरम्यान दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स लावण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे हिंसाचारात ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, त्याची भरपाई निदर्शकांकडून वसूल करण्याचेही सरकारने ठरविले आहे. संभलमध्ये गेल्या रविवारी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात चार जणांचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.

Swapnil S

लखनऊ : संभलमध्ये हिंसाचारादरम्यान दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स लावण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे हिंसाचारात ज्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, त्याची भरपाई निदर्शकांकडून वसूल करण्याचेही सरकारने ठरविले आहे. संभलमध्ये गेल्या रविवारी झालेल्या हिंसाचाराच्या उद्रेकात चार जणांचा मृत्यू झाला, तर पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते.

संभल हिंसाचारामध्ये सहभाग असलेल्या व्यक्तीविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दगडफेक करणाऱ्यांचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात येणार असून त्यांच्याकडून सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून घेण्यात येणार आहे. या समाजकंटकांची माहिती देणाऱ्यांना योग्य ते इनामही दिले जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी २०२० मध्ये सीएएविरुद्ध झालेल्या हिंसाचारात सहभागी असलेल्यांचे पोस्टर्स लावण्यात Sambhal voilenceआले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर ते काढून टाकण्यात आले. शहरातील शाही जामा मशिदीचा सर्व्हे करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते, त्यानंतर सरकारी अधिकारी कारवाई करीत असताना हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.

याप्रकरणी काही महिलांसह १०० जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलीस अन्य फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार