मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन; फिटनेस क्षेत्रातील ओळख ठरली चर्चेचा विषय (Photos-Instagram)
राष्ट्रीय

मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचे निधन; फिटनेस क्षेत्रातील ओळख ठरली चर्चेचा विषय

बुधवारी पहाटे लखनऊमध्ये त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

उत्तर प्रदेशातील राजकीय आणि फिटनेस क्षेत्राला बुधवारी (दि.१३) मोठा धक्का बसला. समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे लखनऊमध्ये त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

फिटनेसप्रेमी अशी खास ओळख

प्रतीक यादव हे केवळ राजकीय घराण्यातील सदस्य नव्हते, तर त्यांनी फिटनेस आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. लखनऊमधील लोकप्रिय 'आयरन कोर फिट' या जिमचे ते मालक होते. शहरातील फिटनेस समुदायात त्यांची विशेष ओळख होती.

सोशल मीडियावर फिटनेस व्हिडीओ शेअर

प्रतीक यादव आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नियमितपणे फिटनेस व्हिडीओ शेअर करत असत. ते आपल्या फॉलोअर्सना फिटनेससाठी प्रेरित करण्याचे काम करत होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल

त्यांच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आली होती. सप्टेंबर २०१२ मध्ये एका प्रसिद्ध बॉडीबिल्डिंग संकेतस्थळाने त्यांना "इंटरनॅशनल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द मंथ" म्हणून गौरवले होते.

प्रतीक अनेकदा सांगायचे की, "वडील मुलायम सिंह यादव यांनी दिलेल्या प्रेरणादायी सल्ल्यामुळेच त्यांनी फिटनेसकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली."

साधना गुप्ता यांचे पुत्र

प्रतीक यादव हे मुलायम सिंह यादव आणि त्यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे पुत्र होते. प्रतीक यांचा विवाह अपर्णा यादव यांच्याशी झाला होता. राजकीय कुटुंबातील सदस्य असूनही ते तुलनेने सामान्य जीवन जगत होते.

लीड्स विद्यापीठातून एमबीए

प्रतीक यादव यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधून एमबीएचे शिक्षण घेतले होते. रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसह विविध व्यावसायिक क्षेत्रांत त्यांनी काम केले होते.

प्राणी सुरक्षेसाठीही काम

फिटनेस आणि व्यवसायासोबतच त्यांची आवड प्राणी सुरक्षा क्षेत्रातही होती. 'जीव आश्रय' या संस्थेमार्फत ते भटक्या प्राण्यांचे रेस्क्यू, अन्न आणि देखभालीचे काम करत होते. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते सक्रियपणे योगदान देत असल्याची माहिती समोर आली आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके