राष्ट्रीय

राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरची चाके रुतली, मोठी दुर्घटना सुदैवाने टळली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये होणारी संभाव्य दुर्घटना सुदैवाने टळली आहे. पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवरील ज्या हेलिपॅडवर राष्ट्रपती मुर्मू यांनी वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने लँडिंग केले, तो हेलिपॅडचा काही भाग अचानक खचला आणि चाके रुतली.

Swapnil S

पट्टनामथिट्टा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत केरळमध्ये होणारी संभाव्य दुर्घटना सुदैवाने टळली आहे. पट्टनामथिट्टा जिल्ह्यातील प्रमादम स्टेडियमवरील ज्या हेलिपॅडवर राष्ट्रपती मुर्मू यांनी वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने लँडिंग केले, तो हेलिपॅडचा काही भाग अचानक खचला आणि चाके रुतली. या घटनेमुळे काही वेळ धावपळ उडाली असली, तरी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. मात्र, जमीन खचल्यामुळे हेलिकॉप्टर अडकले आणि त्याला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना हातभार लावावा लागला.

केरळच्या प्रमादम येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरचे चाक राजीव गांधी इनडोअर स्टेडियम येथे कच्चे कॉन्क्रिट केलेल्या हेलिपॅडमध्ये उतरल्याबरोबर खाली रूतले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी धक्का मारून हे हेलिकॉप्टर बाहेर काढले. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्टेडियमचा पर्याय अखेरच्या क्षणी निवडला गेला आणि यामुळे मंगळवारी रात्री तेथे हेलिपॅड तयार करण्यात आला. यापूर्वी हेलिकॉप्टरला पंबाच्या जवळ निलक्कम येथ उतरवण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र वातावरण बिघडल्याने ते प्रमादम येथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काँक्रिट पूर्णपणे सुकून घट्ट होऊ शकले नव्हते त्यामुळे जेव्हा हेलिकॉप्टर उतरवले गेले तेव्हा त्याचे वजन ते पेलवू शकले नाही आणि जिथे हेलिकॉप्टरची चाके जमिनीवर टेकली तेथे खड्डे तयार झाले आणि चाके रुतली.

हेलिकॉप्टरचे वजन पेलले नाही?

द्रौपदी मुर्मू मंगळवारी केरळच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी तिरुवनंतपुरममध्ये दाखल झाल्या. बुधवारी त्यांनी नियोजित कार्यक्रमानुसार सबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात दर्शन घेतले आणि आरतीसाठी पत्तनामथिट्टा येथे जाण्याचा कार्यक्रम होता. याच दरम्यान प्रमादम स्टेडियममध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वायूसेनेच्या हेलिकॉप्टरच्या वजनामुळे हेलिपॅडचा काही भाग अचानक खाली खचला. या खचलेल्या भागात हेलिकॉप्टर अडकले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टर काढले बाहेर

हा अपघात घडताच तत्काळ सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी धावले. त्यांनी तत्काळ हेलिकॉप्टरला खचलेल्या भागातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये जवान आणि कर्मचाऱ्यांनी हेलिकॉप्टरला ढकलत ते सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे दिसत आहे.

ठाकरे बंधूंची भाऊबीजही खास! बहिणीने बऱ्याच वर्षांनी एकत्र ओवाळलं

लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट! ‘ई-केवायसी’ला तात्पुरती स्थगिती

सलीम डोला ड्रग्ज प्रकरण : हँडलर मोहम्मद सलीम शेख दुबईतून हद्दपार; मुंबई पोलिसांनी केली अटक

दिवाळी साजरी करायला गेलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; नॅशनल पार्कमध्ये भरधाव बाईकने दीड वर्षांच्या चिमुरडीला उडवले, जागीच मृत्यू

Mumbai : सोसायटीमध्ये खेळत असलेल्या ७ वर्षाच्या मुलाला कारने चिरडले, महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल