राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन भाजप पदाधिकाऱ्यांना दीर्घकाळ सत्ता टिकवण्यासाठी नियोजन करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन

वृत्तसंस्था

आपल्याला पुढील २५ वर्षे लोकांची सेवा करायची आहे. त्यादृष्टीने पावलं उचला, असे निर्देश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दीर्घकाळ सत्ता टिकवण्यासाठी नियोजन करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन केले. गुजरात, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जयपूरमध्ये भाजपच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना मोदींनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या महिन्यातच केंद्रात भाजपप्रणित आघाडी एनडीएचं सरकार सत्तेत येऊन आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले, “या महिन्यात भाजपला केंद्रात आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही वर्षे देशाची सेवा करण्याची होती. गरिबांच्या आणि मध्यमवर्गाच्या कल्याणासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी काम करण्याची होती. जनसंघाच्या काळातही आपलं निवडणूक राजकारणात अस्तित्व अल्प होतं; पण तरी आपल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रउभारणीच्या कामात झोकून देऊन काम केलं,” असं मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी पुढील २५ वर्षांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं. “आपण आता पुढील २५ वर्षांसाठीचं उद्दिष्ट निश्चित करत आहोत. हे ध्येय सर्व अडचणींवर मात करत सातत्याने देशाच्या नागरिकांसाठी काम करत राहणं आणि त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणं हे असायला हवं,” असं मोदी म्हणाले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत