प्रियागोल्ड बिस्किटांमध्ये जनावरांचा कोंडा; FSSAI ची कारवाई 
राष्ट्रीय

प्रियागोल्ड बिस्किटांमध्ये जनावरांचा कोंडा; FSSAI ची कारवाई

खाद्यपदार्थ नियमन करणारी सर्वोच्च संस्था 'एफएसएसएआय' ने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर पावले उचलली आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली: खाद्यपदार्थ नियमन करणारी सर्वोच्च संस्था 'एफएसएसएआय' ने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर कठोर पावले उचलली आहेत. 'प्रियागोल्ड' बिस्किटे तयार करणाऱ्या 'सूर्य फूड अँड ॲग्रो' कंपनीविरोधात जनावरांच्या खाद्यातील कोंड्याचा वापर केल्याप्रकरणी आणि इतर गंभीर उल्लंघनांबद्दल खटला भरण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याशिवाय, नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी 'डोडला डेअरी' आणि 'यूईआयआर ऑरगॅनिक फूड्स' यांच्यावरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर एफएसएसएआयने या कंपनीच्या कारखान्याची पाहणी केली असता तपासात असे उघड झाले की, मानवी सेवनासाठी अयोग्य असलेला आणि जनावरांच्या खाद्यासाठी वापरला जाणारा कोंडा, बिस्किटांमध्ये फायबरचा स्रोत म्हणून वापरला जात होता. ज्या गोणपाटांमध्ये हा कोंडा भरलेला होता, त्यावर स्पष्टपणे जनावरांच्या खाद्यासाठी असल्याचे नमूद केले होते. याशिवाय कारखान्यात अस्वच्छता, कीटक नियंत्रण व कच्च्या मालाच्या साठवणुकीत गंभीर त्रुटी आढळल्या. याप्रकरणी कंपनीचा परवाना आधीच निलंबित करण्यात आला असून आता कायदेशीर कारवाई सुरू आहे.

डोडला डेअरीच्या 'फुल क्रीम दूध'चा नमुना तपासणीत निकृष्ट दर्जाचा आढळला. त्यानंतर अपील केल्यावर 'रफरल फूड लॅब'ने केलेल्या चाचणीत हे दूध असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. दुधामध्ये डिटर्जंट/कॉस्टिक सोडा आढळला असून दुधातील फॅटचे प्रमाणही निकषांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : विद्याविहार उड्डाणपुलाच्या नामकरणावरून संघर्ष; नाना पाटेकर व स्मित मच्छार यांच्या नावाची मागणी

Navi Mumbai : क्षुल्लक कारणातून रिक्षाचालकाची हत्या; मुख्य सूत्रधारासह पाच जण अटकेत, दोन अल्पवयीनांचाही सहभाग

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये महाविद्यालयीन युवतीची हत्या

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात चाऱ्याचा, स्थलांतराचा प्रश्न गंभीर; मागणी व पुरवठा यात मोठी तफावत

एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसची सौदीला जाणारी उड्डाणे रद्द