संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

कोण खरा हिंदुस्थानी, हे सुप्रीम कोर्ट कसे ठरवणार! राहुल यांच्या बचावासाठी प्रियांका गांधी सरसावल्या

खरा भारतीय कोण आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही, असे म्हणत खासदार प्रियांका गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : खरा भारतीय कोण आहे हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही, असे म्हणत खासदार प्रियांका गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बचावासाठी पुढे सरसावल्या आहेत. सरकारला प्रश्न विचारणे ही राहुल गांधींची जबाबदारी आहे, कारण ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. कोणीही खरा हिंदुस्थानी असे विधान करू शकत नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. त्यावर प्रियाका गांधी यांनी हे मत व्यक्त केले आहे.

प्रियांका गांधी म्हणाल्या की, न्यायमूर्तींचा संपूर्ण सन्मान ठेवून मी एवढेच सांगू इच्छिते की खरा भारतीय कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना नाही. सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. राहुल गांधी कधीही सैन्याविरोधात बोलणार नाहीत. त्याला सैन्याबद्दल प्रचंड आदर आहे. त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई

मतचोरीविरोधात विरोधकांचा एल्गार! १ नोव्हेंबरला मुंबईत धडकणार ‘सत्याचा मोर्चा’; आंदोलनात कोण सहभागी होणार? जाणून घ्या