राष्ट्रीय

अयोध्येतील मालमत्तेच्या किंमती वर्षभरात दुप्पट

अयोध्येतील निवासी मालमत्तांच्या शोधात ६.२५ पट वाढ झाली आहे

Swapnil S

मुंबई : राम मंदिराचा परिणाम अयोध्येतील मालमत्तेवरही स्पष्ट दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत येथील मालमत्तेच्या किंमती १७९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. राम मंदिर २३ जानेवारीला सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. अयोध्येतील मालमत्तेची किंमत ऑक्टोबर २०२३ मध्ये ३,१७४ रुपये प्रति चौरस फूट होती जी आता जानेवारी २०२४ मध्ये वाढून ८,८७७ रुपये प्रति चौरस फूट झाली आहे.

मॅजिकब्रिक्स रिसर्चचे सांगितले की, अयोध्येतील निवासी मालमत्तांच्या शोधात ६.२५ पट वाढ झाली आहे. यावरून अयोध्येतील निवासी मालमत्ता खरेदीकडे लोकांची उत्सुकता वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अयोध्येतील स्थानिक रिअल इस्टेट ब्रोकर अमित सिंग म्हणाले, गेल्या ५-६ वर्षांत दरात कोणताही बदल झालेला नाही. पण मार्केट रेट खूपच जास्त आहे. शहराच्या काही भागात हे दर इतके वाढले आहेत की स्थानिकांना मालमत्ता खरेदी करणे कठीण झाले आहे.

ते म्हणाले, राम मंदिराचे उद्घाटन आणि शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे गेल्या सहा महिन्यांत मालमत्तेच्या किमती अतिशय उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी इतर अनेक जिल्ह्यांतून व भागांतून येणाऱ्या खरेदीदारांनी येथे चढ्या दराने मालमत्ता खरेदी केली आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत.

मालमत्तेतील सर्वाधिक गुंतवणूक जमिनीत होत आहे. स्थानिक दलालांचे म्हणणे आहे की, शहराव्यतिरिक्त फैजाबाद रोड, चौदाह कोसी परिक्रमा, रिंग रोड, नयाघाट आणि लखनौ-गोरखपूर हायवेच्या आसपास लोक मालमत्ता खरेदी करत आहेत. हे क्षेत्र राम मंदिराच्या ६-२० किलोमीटरच्या परिघात आहे. त्यामुळे येथे गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढत आहे.

अयोध्या जिल्ह्याच्या मुद्रांक आणि नोंदणी विभागानुसार, २०१७ ते २०२२ पर्यंत मालमत्ता नोंदणीमध्ये १२० टक्क्याने वाढ झाली असून २०१७ मध्ये अयोध्येत एकूण १३,५४२ मालमत्तांची नोंदणी करण्यात आली तर २०२२ मध्ये ही संख्या २०,८८९ मालमत्तांवर पोहोचली. रिअल इस्टेट कन्सल्टन्सी ॲॅनॉरॉकच्या मते, जमिनीचा दर १,००० ते २,००० रुपये प्रति चौरस फूट होता, जो आता ४,००० ते ६,००० रुपये प्रति चौरस फूट झाला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी