राष्ट्रीय

अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदार यादी जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी 

काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या धोरणावर सध्या ते आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत.

वृत्तसंस्था

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाच्या निवडीवरून पक्षात सुरू असलेल्या गोंधळात रोज नवी भर पडत आहे. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या असंतुष्ट ज्येष्ठ नेत्यांच्या गटातील ‘जी-२३’चे सदस्य आहेत. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या धोरणावर सध्या ते आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. 

“निवडणुकीची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि काँग्रेसवरील सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विश्वास पुनःस्थापित करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षांनी मतदार यादी सार्वजनिक करण्याचे किंवा इच्छुक उमेदवाराला ई-मेल करण्याचे निर्देश द्यावेत,” असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस खासदार मनीष तिवारी, शशी थरूर, कार्ती चिदंबरम यांनी यापूर्वीच मतदार यादी सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसचा राजीनामा देणारे गुलाम नबी आझाद यांनीही काँग्रेस सदस्यत्व आणि अध्यक्षनिवडीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार असून, त्यासाठी २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन