लुधियाना : पंजाब पोलिसांनी लुधियानामध्ये आयएसआय-संचालित मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी परदेशी हँडलर्सच्या १० प्रमुख एजंटांना अटक केली आहे. आरोपी ग्रेनेड उचलण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी मलेशियातील तीन एजंटांमार्फत पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे, असे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले.
प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपी हातबॉम्ब उचलण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी मलेशियातील तीन कार्यकर्त्यांमार्फत पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते. राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी लोकवस्ती असलेल्या भागात ग्रेनेड हल्ला करण्याचे काम या दहशतवाद्यांना देण्यात आले होते.
पोलिसांनी प्रारंभी तिघांना लुधियानाच्या बस्ती जोधेवाल येथून अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी एक हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर लुधियाना पोलिसांनी पुढील तपास केला. त्यानंतर काही इतर आरोपींची ओळख पटली. अटक केलेल्या आरोपींवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विदेशातील आरोपींविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.