राष्ट्रीय

‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये भारतातील ५४ विद्यापीठांचा समावेश

‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६’ नुकतीच जाहीर झाली असून यावर्षी भारतासाठी संमिश्र चित्र दिसून आले आहे. एकूण ५४ भारतीय विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे. २०१४ मधील केवळ ११ विद्यापीठांच्या तुलनेत ही मोठी वाढ मानली जात आहे.

नेहा जाधव - तांबे

नवी दिल्ली : ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६’ नुकतीच जाहीर झाली असून यावर्षी भारतासाठी संमिश्र चित्र दिसून आले आहे. एकूण ५४ भारतीय विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे. २०१४ मधील केवळ ११ विद्यापीठांच्या तुलनेत ही मोठी वाढ मानली जात आहे.

या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर असून अमेरिका, युके आणि चीननंतर सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश ठरला आहे. मात्र, यातील केवळ तीनच भारतीय विद्यापीठे ‘टॉप २००’मध्ये स्थान मिळवू शकली आहेत.

‘टॉप २००’मध्ये केवळ तीन भारतीय संस्था

या रँकिंगमध्ये आयआयटी दिल्ली - १२३ व्या क्रमांकावर असून गेल्या वर्षीच्या १५० व्या स्थानावरून संस्थेने मोठी झेप घेतली आहे. २०२४ मध्ये आयआयटी दिल्लीचे स्थान १९७ होते. नोकरी संधीमध्ये आयआयटी दिल्ली ५० व्या क्रमांकावर असून, संशोधनामध्ये ८६ वा आणि ‘अकॅडमिक रेकग्निशन’मध्ये १४२ वा क्रमांक मिळाला आहे. आयआयटी मुंबई १२९ व्या स्थानावर असून २०२४ मध्ये ती ११८ व्या स्थानी होती. आयआयटी मद्रासने यावर्षी ४७ स्थानांची सुधारणा करत १८० व्या क्रमांकावर सर्वात मोठी झेप घेतली आहे.

नवीन भारतीय विद्यापीठांची एन्ट्री

यावर्षी ८ नवीन भारतीय संस्थांनी यादीमध्ये प्रवेश केला असून, कोणत्याही देशापेक्षा ही सर्वाधिक नवीन नोंद आहे. त्यामुळे भारतीय उच्च शिक्षणसंस्था हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृश्यमान होत आहेत.

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची विविधता पाहणार

या वर्षीच्या रँकिंगमध्ये एक नवा घटक ‘आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची विविधता’ समाविष्ट करण्यात आला आहे. तथापि, यावर गुण दिले गेलेले नाहीत. हे मोजमाप विद्यापीठात किती परदेशी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे विविधतेचे प्रमाण काय आहे, यावर आधारित आहे.

धर्मेंद्र प्रधान यांची प्रतिक्रिया

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवरून याची दखल घेतली असून, भारताचे वाढते प्रतिनिधित्व हा एक सकारात्मक संकेत असल्याचे म्हटले आहे. नव्या शैक्षणिक धोरणांमुळे भारतातील विद्यापीठांना अधिक जागतिक दर्जा प्राप्त होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video