संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

कर्नाटकात निवडणूक आयोगाने केली फसवणूक, काँग्रेसकडे पुरावे; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा

कर्नाटकातील एका मतदारसंघात निवडणूक आयोगाने फसवणूक करण्यास परवानगी दिल्याचे '१०० टक्के पुरावे' काँग्रेसकडे आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. तुम्ही यातून सुटू शकत नाही, असा इशारा त्यांनी निवडणूक आयोगाला दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : कर्नाटकातील एका मतदारसंघात निवडणूक आयोगाने फसवणूक करण्यास परवानगी दिल्याचे '१०० टक्के पुरावे' काँग्रेसकडे आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. तुम्ही यातून सुटू शकत नाही, असा इशारा त्यांनी निवडणूक आयोगाला दिला.

बिहारमध्ये मतदार यादी सखोल पाहणीच्या विरोधात बोलताना राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर कर्नाटकात फसवणूक केल्याचा आरोप केला. मतदान यादी पुनर्विलोकनाच्या नावावर कर्नाटकात हजारो बनावट मतदारांची नावे जोडली गेली आहेत. याचे आमच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. एकाच मतदारसंघात ५०, ६० व ६५ वर्षीय हजारो नवीन मतदारांची नावे यादीत घुसडण्यात आली, तर १८ वर्षांवरील अनेक नावे मतदार यादीतून काढण्यात आली. आम्हाला एका मतदारसंघातील यादीत हा घोटाळा सापडला आहे. पण, प्रत्येक मतदारसंघात हा घोटाळा झाला असावा, असा मला विश्वास आहे. तुम्ही यातून सुटाल, असे तुम्हाला वाटत असल्यास हे चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असे आव्हान गांधी यांनी दिले.

सनसनाटी आरोप करू नका - निवडणूक आयोग

राहुल यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, सनसनाटी आरोप करू नका. याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल आहे. त्यावर हायकोर्टाच्या निकालाची वाट पाहिली पाहिजे. मृत व स्थलांतरित मतदारांच्या नावावर बनावट मतदान करायला परवानगी दिली पाहिजे का? या मतदार यादीचे सखोल निरीक्षणाचे ध्येय केवळ अयोग्य मतदारांना मतदार यादीतून हटवणे हे आहे. नि:पक्ष मतदार यादी निवडणूक व मजबूत लोकशाहीचा पाया नाही का? असा सवाल आयोगाने विचारला.

याबाबत भारताच्या सर्व नागरिक, सर्व राजकीय विचारधारांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. बिहारमध्ये ९९ टक्के मतदारांचे पुनर्परीक्षण केले आहे. यात २१.६ लाख मृत, तर ३१.५ मतदारांनी स्थलांतरण केले आहे. ७ लाख मतदार अनेक ठिकाणी नोंदणीकृत असून १ लाख मतदार बेपत्ता आहेत. घरोघरी जाऊनही ७ लाख मतदारांचे फॉर्म मिळालेले नाहीत, असे आयोगाने सांगितले.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास