Photo : X
राष्ट्रीय

हिंमत असेल तर मोदींनी ट्रम्प खोटे बोलतात हे सांगावे - राहुल गांधी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचा दावा जवळपास २९ वेळा केला. मोदी हे इंदिरा गांधी यांचे उदाहरण देतात, त्यांच्यात इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्के जरी हिंमत असेल तर त्यांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत असे संसदेत सांगावे, असे थेट आव्हानच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचा दावा जवळपास २९ वेळा केला. मोदी हे इंदिरा गांधी यांचे उदाहरण देतात, त्यांच्यात इंदिरा गांधींच्या तुलनेत ५० टक्के जरी हिंमत असेल तर त्यांनी ट्रम्प खोटे बोलत आहेत असे संसदेत सांगावे, असे थेट आव्हानच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.

पहलगाममध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सिंदूर’वर मंगळवारी लोकसभेत चर्चा झाली. या चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी म्हणाले, भारत सरकारने घोडचूक केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत राजनाथ सिंह यांनीच सांगितले की आम्हाला युद्ध नकोय. त्यांनी सभागृहात सांगितले मी काहीही खोटे बोलत नाही.

माणेकशॉ यांना वेळ दिला!

या सभागृहात सॅम माणेकशॉ यांचे उदाहरण दिले गेले. त्यावेळी सॅम माणेकशॉ यांनी सांगितले होते सहा महिन्यांचा वेळ द्या, आपल्याला जी मोहीम राबवायची आहे ती आपण उन्हाळ्यात राबवू. इंदिरा गांधींनी त्यांना पुरेसा वेळ दिला होता. मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले ते फक्त त्यांची प्रतिमा सांभाळण्यासाठी, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या देशातील सुरक्षा दलांचा उपयोग देशाच्या रक्षणासाठी झाला पाहिजे कुणाच्याही प्रतिमा जपण्यासाठी नाही, असेही ते म्हणाले.

मोदींनी हे सांगायला हवे होते की, जा तुम्हाला खुली सूट आहे, मात्र त्यांनी आपले पायलट असोत किंवा सैन्य दले त्या सगळ्यांना हात बांधून युद्ध करायला पाठवले. पाकिस्तानशी युद्ध करण्याची तुमची राजकीय इच्छाशक्तीच नव्हती. भारत देश हा तुमच्या प्रतिमेपेक्षा मोठा आहे, तुमच्या राजकारणापेक्षा मोठा आहे, असेही राहुल गांधी यांनी मोदी यांनी उद्देशून सांगितले.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’