राष्ट्रीय

राहुल गांधी यांचा १ नोव्हेंबरला 'चलो दिल्ली'चा नारा

निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य करत 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या सभेला विद्यार्थी, शेतकरी, मजूर, महिला, तरुण आणि व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे केले आहे.

‘आमची मते चोरली जात आहेत आणि हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही,’ असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप केला. लोकशाहीत नागरिकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असून, त्यांच्या मतांचा आणि आवाजाचा आदर केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मतांची कथित चोरी आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

हरियाणा काँग्रेसचे प्रभारी संजय दत्त आणि प्रदेशाध्यक्ष राव नरेंद्र सिंह यांनी रामलीला मैदानावरील सभेला १० लाखांहून अधिक लोक उपस्थित राहतील, असा दावा केला आहे. या सभेच्या माध्यमातून विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांचा मुद्दा देशभरात उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या व्यापारी संघटनेने राहुल गांधी यांना इंडिया ब्लॉकची रॅली पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...

SIR साठी वापरलेल्या सॉफ्टवेअरची माहिती देणे अशक्य; ट्रेड सिक्रेट असल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीला अर्थखाते? फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद; हिवाळी अधिवेशनापूर्वी निर्णय होण्याची शक्यता

Navi Mumbai : 'नैना'त १५ लाख रोजगार निर्मिती; भूमिपुत्रांना प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

स्थानिकांच्या उत्पादनांना प्राधान्य द्या! 'मन की बात'मधून पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन