ट्रम्प करतात मोदींना नियंत्रित; राहुल गांधींनी केला दावा, पुन्हा दिले चर्चेचे आव्हान 
राष्ट्रीय

ट्रम्प करतात मोदींना नियंत्रित; राहुल गांधींनी केला दावा, पुन्हा दिले चर्चेचे आव्हान

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले. पंतप्रधान मोदी हे 'देशद्रोही' आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर ते काम करतात हे आपण पाच मिनिटांत सिद्ध करू शकतो, असा दावा त्यांनी केला.

Swapnil S

संगरूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले. पंतप्रधान मोदी हे 'देशद्रोही' आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर ते काम करतात हे आपण पाच मिनिटांत सिद्ध करू शकतो, असा दावा त्यांनी केला.

संगरूर येथे काँग्रेस पक्षाच्या 'इन्साफ रॅली'ला संबोधित करताना गांधी म्हणाले की, मोदी त्यांच्यासोबत चर्चेसाठी एका टेबलावर बसायला तयार होणार नाहीत. चर्चेसाठी पंतप्रधान कोणालाही न्यायाधीश म्हणून निवडू शकतात आणि ठिकाणही ठरवू शकतात, असेही ते म्हणाले. काल मी मोदींना समोरासमोर चर्चेचे आव्हान दिले. या चर्चेसाठी ते कोणालाही न्यायाधीश बनवू शकतात.

मी देशाला हमी देतो की मोदी माझ्यासमोर बसू शकणार नाहीत. चर्चा सुरू झाल्याच्या पाच मिनिटांतच मी हे सिद्ध करू शकेन की मोदी 'देशद्रोही' आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प त्यांना नियंत्रित करत आहेत,” असे गांधी म्हणाले.

दबावाखाली करार

दरम्यान, भारत-अमेरिका व्यापार करारावरून पंतप्रधानांवर निशाणा साधत गांधी यांनी संगरूर येथील सभेत आरोप केला की, मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळ किंवा नोकरशहांना न कळवता ट्रम्प यांच्या दबावाखाली करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे भारतातील शेतकरी, लघु व मध्यम उद्योग आणि डेटा या हितसंबंधांशी तडजोड झाली असल्याचा दावा त्यांनी केला. नरेंद्र मोदींनी ५ मिनिटांत अमेरिकेच्या करारावर स्वाक्षरी केली. त्यांनी मंत्रिमंडळालाही कळवले नाही. त्यांनी कोणत्याही नोकरशहालाही सांगितले नाही. ट्रम्प यांनी त्यांना धमकी दिली आणि त्यांनी अमेरिकेच्या करारावर स्वाक्षरी केली.

कोठेही चर्चेला तयार

काँग्रेस नेत्यांवर देशद्रोही असल्याचा आरोप करणाऱ्या मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ देत गांधी म्हणाले की, दूरचित्रवाणी स्टुडिओसह कोणत्याही ठिकाणी या आरोपांवर चर्चा करण्यास आपण तयार आहोत. या चर्चेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत किंवा उद्योगपती गौतम अदानी यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते, असेही त्यांनी सुचवले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दंड थकवणाऱ्यांना 'अभय'; दंडावर २० टक्के सवलत, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टला मोठा दिलासा; राम मॅन्शनच्या खरेदी व्यवहारावरील मुद्रांक शुल्क माफ

दिवाळीआधी FDA ची मोठी कारवाई; राज्यव्यापी धडक मोहिमेत १८ अन्न व्यवसाय परवाने निलंबित, ४ आस्थापनांचे कामकाज केले बंद

दिवाळी अंक खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद; महागाईतही किंमती स्थिर, मराठी दिवाळी अंकांची ११७ वर्षांची परंपरा

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा : भारतीय पुरुष हॉकी संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत