Photo : X (@INCIndia)
राष्ट्रीय

...अन् राहुल गांधींचे म्हणणे ठरले खरे!

‘नरेंद्र मोदी यांच्यात आज लोकसभेत येण्याची हिंमत होईल, असे वाटत नाही. कारण ते आले तर त्यांना आपण माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत देऊ म्हणजे मोदी ते पुस्तक वाचतील आणि देशाला सत्य कळेल’, असे सकाळी संसद परिसरात राहुल गांधी म्हणाले आणि आश्चर्य म्हणजे सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याने पंतप्रधान खरेच संसदेत फिरकलेच नाहीत. यामुळे राहुल गांधींचा अंदाज खरा ठरल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘नरेंद्र मोदी यांच्यात आज लोकसभेत येण्याची हिंमत होईल, असे वाटत नाही. कारण ते आले तर त्यांना आपण माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत देऊ म्हणजे मोदी ते पुस्तक वाचतील आणि देशाला सत्य कळेल’, असे सकाळी संसद परिसरात राहुल गांधी म्हणाले आणि आश्चर्य म्हणजे सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याने पंतप्रधान खरेच संसदेत फिरकलेच नाहीत. यामुळे राहुल गांधींचा अंदाज खरा ठरल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.

माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील काही उताऱ्यांवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिवचले. राहुल गांधी संसदेच्या आवारात नरवणे यांच्या पुस्तकाची प्रत घेऊन ते आले. ‘हे पुस्तक परदेशात उपलब्ध आहे. परंतु आपले सरकार ते भारतामध्ये प्रकाशित होऊ देत नाही. नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये प्रदीर्घ लष्करी सेवेतील अनुभव मांडला आहे. 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' असे या पुस्तकाचे नाव आहे. जानेवारी २०२४ मध्ये ते प्रकाशित होणार होते, मात्र त्यामधील दोन प्रमुख विषयांवरून वाद झाला’, असे राहुल म्हणाले.

मोदींची ‘ती’ एक ओळ

त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये एका वृत्तसंस्थेने त्यामधील काही उतारे प्रसिद्ध केले आणि लष्कराने या पुस्तकाची तपासणी सुरू केली. या उताऱ्यांमध्ये २०२० मध्ये भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेख होता, नरवणे यांचे पुस्तक प्रत्येक भारतीय तरुणाने वाचले पाहिजे. त्यामध्ये लडाखच्या प्रसंगाचे पूर्ण दाखले देण्यात आले आहेत. या पुस्तकातील मजकूर उद्धृत करावयाचा नाही, असे आपल्याला सांगण्यात आले. मात्र ‘जो उचित समझो, वो करो’, अशी मोदींची एक ओळ आहे, असे गांधी म्हणाले.

सभागृह तहकूब झाल्याने पंतप्रधान संसदेत फिरकलेच नाहीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी लोकसभेत हजर राहणार होते. पण त्याआधीच सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी व सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याने व विरोधकांनी सभागृहाच जोरदार निदर्शने व गदारोळ केल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त्यामुळे पंतप्रधानांना कोंडीत पकडण्याची राहुल गांधींची व्यूहरचना उधळली गेली.

नेपाळमध्ये हाहाकार! महापुरात हजारो गेले वाहून, ९५ जणांचा मृत्यू, १३३ भारतीयांसह शेकडो बेपत्ता; नांदेडच्या पर्यटकांचाही समावेश

गरज असेल तरच घराबाहेर पडा; महाराष्ट्रासह २६ राज्यांना १३ तास संकटाचे, हवामान खात्याचा इशारा

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी

MPSC Paper Leak: तीन अधिकाऱ्यांसह सहा जण अटकेत; अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, क्लासचालकही ताब्यात

बिलाचे २ कोटी थकवले, सरकारी कंत्राटदाराची आत्महत्या; जबाबदार अधिकाऱ्यावर आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन