ई-२० नव्हे, ई ४२० इंधन! जनतेच्या गाड्यांमधून पेट्रोलचोरी - राहुल गांधी 
राष्ट्रीय

ई-२० नव्हे, ई ४२० इंधन! जनतेच्या गाड्यांमधून पेट्रोलचोरी - राहुल गांधी

कर्नाटक सरकारने गोळा केलेल्या इंधन नमुन्यांच्या चाचणी अहवालाचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशभरात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात किती प्रमाणात इथेनॉल मिसळले जात आहे, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली: कर्नाटक सरकारने गोळा केलेल्या इंधन नमुन्यांच्या चाचणी अहवालाचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. देशभरात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात किती प्रमाणात इथेनॉल मिसळले जात आहे, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हिंदीत केलेल्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, "ई२० बनले ४२० जनतेच्या गाड्यांमधून पेट्रोलची चोरी! भारतीय दंड संहितेच्या फसवणुकीशी संबंधित कलम ४२० चा संदर्भ देत त्यांनी सरकारवर टीका केली.

सरकार पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल असल्याचा दावा करते; परंतु कर्नाटकातील सात जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या पेट्रोलच्या नमुन्यांमध्ये टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल २० आढळून आल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

मर्यादा ओलांडली

७ कर्नाटक सरकारने जिल्ह्यांमधून पेट्रोलचे नमुने गोळा करून ते मान्यताप्राप्त लॅबमध्ये तपासले. त्याचा निकाल पाहा १४ पैकी ११ नमुन्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल आढळले आहे. आयओसीएलमध्ये हे प्रमाण ३१.२ टक्के तर एचपीसीएलमध्ये ३०.५ टक्के आढळले. सरकारी असो वा खासगी आयओसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल, नयरा आणि शेल या सर्व कंपन्यांनी ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली आहे, असा आरोप त्यांनी केला.

चर्चेचे आव्हान

पेट्रोलमध्ये जास्त प्रमाणात इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, मायलेज कमी होते आणि गाड्यांच्या देखभालीचा (मेंटेनन्स) खर्च वाढतो. तसेच, इंधन स्टेशनवर (पेट्रोल पंपांवर) पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण दर्शवणारे लेबल का लावले जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशातील वाहनांच्या टाक्यात नक्की काय टाकले जात आहे, हे मोदी यांनी सांगावे, पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात किती इथेनॉल आहे आणि २० टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणाऱ्या कंपन्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न त्यांनी विचारले. राहुल यांनी मोदी यांना पुन्हा एकदा खुल्या चर्चेचे आव्हान देत, या चर्चेत इथेनॉल ब्लेंडिंगच्या मुद्द्याचाही समावेश केला जाऊ शकतो, असे म्हटले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा