'फॉर्म ६'मध्ये बेकायदा बदल; टीसीएसला आदेश कोणी दिले - राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

'फॉर्म ६'मध्ये बेकायदा बदल; टीसीएसला आदेश कोणी दिले - राहुल गांधी

नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन 'फॉर्म ६' मध्ये बेकायदेशीरपणे बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : नवीन मतदार नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन 'फॉर्म ६' मध्ये बेकायदेशीरपणे बदल करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला आहे. तसेच, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला हा बदल करण्याचे आदेश निवडणूक आयोगातील कोणत्या अधिकाऱ्याने दिले आणि कंपनीच्या कोणत्या अधिकाऱ्याने त्यावर स्वाक्षरी केली, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि संप्रेषण विभागप्रमुख जयराम रमेश यांनी दावा केला आहे की, फॉर्म ६ मधील हा बदल ‘पंतप्रधान आणि गृहमंत्री' यांच्या जोडीने घडवून आणला आहे. राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले आहे की, ऑनलाइन फॉर्म ६ बेकायदेशीरपणे बदलण्यात आला आहे - जसे की खुद्द निवडणूक आयुक्तांनीच नोंदवले आहे. ईसीआयमधील कोणीतरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला हा बदल करण्याचे आदेश दिले, ‘टीसीएसमधील कोणी यावर स्वाक्षरी केली? आणि हा बदल करण्यासाठी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का?

जेन-झी मतदारांना वगळण्यासाठीच बदल...

राहुल गांधींच्या पोस्टला टॅग करत जयराम रमेश म्हणाले, जेन-झी मतदारांना मतदारयादीतून वगळण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी जुलै २०२६ च्या मध्यात घटनेच्या विरोधात जाऊन फॉर्म ६ मध्ये बदल केले. हा सर्व प्रकार स्पष्टपणे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या (मोदी-शहा) जोडीने घडवून आणला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

झुरळांचे आज 'चलो शिवाजी पार्क'; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP चे देशव्यापी आंदोलन; शहांनी केलेली चूक फडणवीसांनी टाळावी - दीपके

Pune : ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; दिवेआगर समुद्रात आळंदीच्या विनर्स अकादमीच्या सहलीची शोकांतिका

दुष्काळाची धग, सत्तेची मस्ती सत्ताधाऱ्यांना!

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, २ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत