राहुल गांधी  (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

राहुल गांधी यांना दिलासा; भाजप नेत्याची मानहानीची याचिका न्यायालयाने फेटाळली

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माहानीच्या एका जुन्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने राहुल यांच्याविरोधात केलेली मानहानीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Swapnil S

बंगळुरू : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माहानीच्या एका जुन्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. भाजपच्या स्थानिक नेत्याने राहुल यांच्याविरोधात केलेली मानहानीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

सदर प्रकरण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळातील करप्शन रेट कार्ड या जाहिरातीशी संबंधित आहे. तत्कालीन भाजप सरकारवर आरोप करताना काँग्रेसने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. यामध्ये भाजप सरकारने ४० टक्के कमिशन घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे भाजपची प्रतिम मलिन झाल्याचा दावा करून राहुल यांच्यासह काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.

संबंधित जाहिरात ही राजकीय टीका होती, ती तक्रारदाराच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला धक्का लावणारी ठरत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने याप्रकरणी समन्स बजावले होते, त्याला राहुल यांनी उच्च न्य्यालयात आव्हान दिले होते.

Mumbai : महापौरांचा पती असल्याचे सांगत शिक्षकाच्या फोटोचा गैरवापर; बदनामीकारक यूट्यूब व्हिडीओप्रकरणी FIR दाखल

Mumbai : चेंबूरमध्ये धक्कादायक प्रकार! चारित्र्यावर संशय घेत गर्भवती प्रेयसीचा काढला काटा; प्रियकराला अटक

Video : चुकून लेडीज डब्यात चढला; धावत्या लोकलमधून उडी मारणार इतक्यात...

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन