८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी 
राष्ट्रीय

८५० चा आकडा म्हणजे लोकशाहीची हत्या - राहुल गांधी

भाजप देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकात लोकसभेच्या प्रस्तावित ८५० जागांचा आकडा हा भारतीय लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भाजप देशाला हुकूमशाहीकडे नेत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकात लोकसभेच्या प्रस्तावित ८५० जागांचा आकडा हा भारतीय लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना भारताचा निवडणूक नकाशा नव्याने आखण्यासाठी मोकळे मैदान देण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. विधेयके आणण्याची सरकारची ही चाल देशाच्या मूलभूत रचनेत बदल करण्याचा भाजपचा नवा मार्ग आहे, असा आरोपही त्यांनी केला.

लोकसभेच्या ८५० जागा का, याचे उत्तर आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आहे. त्यांच्याकडे ८५० जागा असतील, तर ते स्वतःच्या सोयीनुसार निवडणूक नकाशा नव्याने आखू शकतात. त्यांना विरोध करणाऱ्या समुदायांचे प्रतिनिधित्व कमकुवत करू शकतात आणि विरोधी पक्षातील विशिष्ट नेत्यांना लक्ष्य करू शकतात, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या विधेयकामुळे भाजपला एकही मत पडण्यापूर्वीच मोठा फायदा मिळेल, तरुणांनी, विशेषतः जेन झीने, लक्षात ठेवावे की ८५० हा आकडा भारतीय लोकशाहीच्या हत्येचे प्रतिनिधित्व करतो. मोदी, शहा आणि ज्ञानेश कुमार यांना भारताचा निवडणूक नकाशा नव्याने आखण्यासाठी मोकळे मैदान देण्याचा हा प्रयत्न आहे,' असे राहुल गांधी म्हणाले.

आयोगावर कब्जा

अदानी, मोदी, शहा आणि त्यांचे हस्तक ज्ञानेश कुमार यांची याद्वारे देशाची लूट सुरू ठेवण्याची योजना आहे, असा आरोपही त्यांनी केला. परिसीमन प्रक्रिया मोदी आणि शहा यांनी नियुक्त केलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून ठरवली जाणार आहे, परिसीमन आयोगातील तिसरा सदस्य ज्ञानेश कुमार निवडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगावर कब्जा करण्यात आला असून, आता सरकारला परिसीमन आयोगावरही कब्जा करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.

हा भाजपचा नवा मार्ग आहे. देशाची मूलभूत रचना बदलण्याचा भाजप विचार करत आहे, या प्रक्रियेचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सामाजिक न्याय आहे, जातीय जनगणनेचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला आहे. २०२७ची जनगणना काही अस्वस्थ करणारी तथ्ये समोर आणेल, जी भाजपला मान्य नाहीत, गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमातींचे अधिकार कमी केले जातील आणि अल्पसंख्याकांना दुर्बल केले जाईल, अनुसूचित जाती-जमातींची लोकसंख्या वाढेल, मात्र त्यांच्या लोकसभा जागांमध्ये वाढ होणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

इंडिया आघाडीचा विधेयकाला विरोध; द्रमुक, अकाली दल, BRS, YSR काँग्रेसचा विधेयकाला पाठिंबा; तर काँग्रेस, सपा, ठाकरे सेनेचा विरोध

महिला विधेयक कोणीही रोखू शकत नाही - पंतप्रधान मोदी

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Pressure Cooker Cleaning Tips : कुकरच्या शिट्टीमध्ये अडकलीये घाण? फक्त २ मिनिटांत करा स्वच्छ; जाणून घ्या सोपी पद्धत

रात्रीचा भात उरलाय? फोडणीचा भात न करता बनवा हॉटेलसारखी बिर्याणी; रेसिपी अगदी सोपी